Join WhatsApp group

Ads

-

पवित्र नात्याला काळिमा; भावजयीच्या विनयभंगप्रकरणी सख्ख्या दिराविरुद्ध गुन्हा

By Sarkar Maza

June 27, 2026 9:19 am

Ads

मूर्तिजापूर : नात्यांवरील विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना मूर्तिजापूर शहरात उघडकीस आली आहे. स्वतःच्या सख्ख्या भावजयीशी अयोग्य वर्तन करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेलिफोन कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या एका फिर्यादी महिलेने दि. २६ जून रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून सुरज घनश्याम टुनलाईट (वय ३५, रा. वाल्मिकी नगर, चिखली, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५ (१)(अ) व ३२९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे १.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला त्यांच्या भाड्याच्या घरात झोपलेल्या असताना आरोपी त्यांच्या जवळ येऊन अयोग्य कृत्य करू लागल्याचा आरोप आहे.

महिलेने आरोपीला विरोध करत वडिलांना सर्व प्रकार सांगण्याचा इशारा दिला असता, आरोपीने बदनामीची धमकी देत गप्प राहण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर महिलेने आरोपीला प्रतिकार करून तेथून निघून जात आपल्या वडिलांकडे आश्रय घेतल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, ही घटना एप्रिल महिन्यात घडल्याचे तक्रारीत नमूद असले तरी, याबाबतची तक्रार दि. २६ जून रोजी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक नात्यांतील विश्वास आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.

Related Article

आयुक्त तुकाराम मुंढे- पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कठोर भूमिकेनंतरही जिल्ह्यात गुटखा-मटका राज कायम?

माणुसकीचे दर्शन! विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक यांची धाव

‘मुद्रांक शुल्कात सवलतीचा सौदा महागला’; अकोल्यात जिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात

अकोला जिल्ह्यात मान्सूनचा दमदार धडाका; शेतकऱ्यांना दिलासा, काही भागात पिकांचे मोठे नुकसान

राज्य सरकारचे आश्वासन; शेतकऱ्यांना आता हक्काची मदत हवी! तर आमदार हरिष पिंपळे यांची अग्नी परीक्षा

नाशिकमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त ‘ऑलिम्पिक सप्ताह’चे आयोजन, 23 ते 30 जूनदरम्यान विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!