Join WhatsApp group

Ads

-

हिरपूर रोडवरील उड्डाणपुलाजवळ पोलिसांचा गांजा तस्करीवर प्रहार!ऑटोमधून दोन किलो गांजा जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

By Sarkarmzanews

November 13, 2026 9:13 pm

Ads

मुर्तिजापूर : प्रतिनिधी

अमली पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात अकोला जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मुर्तिजापूर शहर पोलिसांनी गांजा तस्करीविरोधात कारवाई केली. अमरावतीकडून मुर्तिजापूरकडे येणाऱ्या ऑटो रिक्षातून पोलिसांनी दोन किलो गांजा जप्त केला असून, याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो क्रमांक MH 27 BW 3577 मधून गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी हिरपूर रोडवरील उड्डाणपुलाजवळ सापळा रचून संशयित ऑटो अडवला. तपासणीदरम्यान त्यामध्ये दोन किलो गांजा आढळून आला.

या प्रकरणी नासिर खान हबीब खान (रा. गुलिस्तान नगर, यास्मिन नगर झोपडपट्टी) आणि शेख शब्बीर शेख समद (रा. यास्मिन नगर झोपडपट्टी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, राजेंद्र वानखेडे, एएसआय पांडे तसेच पोलीस कर्मचारी व पथकाने केली.

तस्करीच्या मागचे जाळे उघड होणार का?

दोन किलो गांजा जप्त करून पोलिसांनी वाहतुकीचा एक टप्पा उघड केला असला, तरी हा गांजा नेमका कुठून आणला जात होता, त्याचा पुरवठादार कोण आणि शहरात त्याची विक्री कोणामार्फत होणार होती, हे तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.

केवळ वाहतूक करणाऱ्यांपुरती कारवाई मर्यादित न राहता या अवैध व्यवसायाच्या मूळ पुरवठा साखळीपर्यंत पोलीस पोहोचतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ऑपरेशन प्रहारअंतर्गत पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची असली, तरी अमली पदार्थांचा पुरवठा आणि स्थानिक विक्रीचे जाळे कायमचे उद्ध्वस्त करणे हेच या मोहिमेचे खरे यश ठरणार आहे.

NEWS THUMNEL PHOTO : AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!