Join WhatsApp group

Ads

मुर्तीजापुर शहरात २० वर्षीय खेळाडू तरुणाचा अपघातात मृत्यु

By Sarkarmzanews

December 5, 2024 10:13 am

Ads

प्रेमराज शर्मा : मुर्तीजापुर, दिनांक ०५ : मुर्तीजापुर गुरुवारी सकाळी एका दुःखद घटनेत, २० वर्षीय ऋषिकेश गाडेकर, रा. सत्संग भवन परिसर, घटनेच्या वृत्तानुसार दिनांक ०४ बुधवारी रात्री ११ वा. दरम्यान हा युवक बायपास वरून बुलेट गाडी वरून घरी येत असताना त्याचा मोटारसायकलचा अपघात झाल्याचे समजते, पण घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अपघात झाल्या नंतर तो रात्रभर जयस्वाल यांचा देशी दारूचा दुकाना थोड्या समोर रस्त्याचा कडेला बुलेट गाडी घेऊन पडला होता. मात्र रात्रभर त्यावर कोणाचे लक्ष गेले नसून सकाळी काही नागरिकांना तो रस्त्याचा कडेला त्याचा गाडी सोबत आढळून आला स्थानिक नागरिकांचा मदतीने त्याला तत्काळ ल.दे. रुग्णालयात मुर्तीजापुर येथे दाखल करण्यात आले, त्याला डोक्यावर मार असून रक्तस्त्राव सुरु होता, त्याच्या दुखापतींची तीव्रता लक्षात घेता, त्याला प्रगत उपचारासाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण दुर्दैवाने रक्तस्त्राव रात्रभरात जास्त झाल्याने ऋषिकेशला आपला जीव गमवावा लागला.

ऋषिकेश हा एक खाजगी शाळेत क्रीडा शिक्षक असून, बॉल बॅडमिंटन खेळाचा खेळाडू होता राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर त्याने क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव गाजविले होते. तसेच अनेक खेळाडू त्यांनी जिल्ह्यात घडविले होते. त्याचा जाण्याने त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. दुःखाने भारावून गेलेले नातेवाईक आणि मित्र अनेक खेळाडू सध्या त्यांच्या घरी जमले आहे.

आज शवविच्छेदनाचा प्रक्रिये नंतर त्याचे अंतिम संस्कार करण्यात येईल.

सरकार माझा न्यूज – लोकहितार्थ अर्पण…….

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!