Join WhatsApp group

Ads

दुचाकीला भरधाव कारची धडक : आई, वडील, मुलगी जखमी

By Sarkarmzanews

November 27, 2024 1:21 pm

Ads

प्रेमराज शर्मा : दिनांक २७: मूर्तिजापूर येथील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक 26 नोव्हेंबर 24 रोजी सकाळी ८ वाजता भरधाव कारची दुचाकीला धडक लागून दुचाकीवरील तिघे गंभीररित्या जखमी झाले.

येथील वृंदावन नगरातील दिपाली शमुवेल जाधव (वय ४१) यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, त्यांचे मावस भाऊ अरूण देशमुख, त्यांची पत्नी व मुलगी यांना त्यांच्या दुचाकीने शाळेत घेऊन जात असताना आरोपी कार चालक मध्य प्रदेशातील पांढुर्ण्याचा निरज होरीलाल जयस्वाल टाटा हॕरीअर कार (क्रमांक सीजी ०९ एच९९९९) भरधाव वेगाने चालवीत अरूण देशमुख यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

त्यामुळे ते त्यांची पत्नी व मुलीसह खाली पडले. त्यांच्या डाव्या पायाला गंभीर मार लागुन जखमी होवुन पायांचे हाड तुटुन फॅक्चर झाले व चेहर-यावर डाव्या बाजुने घसरल्याचा मार लागला आहे. त्यांच्या पत्नीच्या डोक्याला मार लागुन जखम तसेच शरीरावर ईतर ठिकाणी मुकामार लागला आहे. मुलीच्या डाव्या पायाला मार लागुन दुखापत झाली व तिचे चेह-यावर सुदधा अपघातामुळे मार लागुन जखम झाली तसेच शरीरावर इतर ठिकाणी मुका मार लागला आहे.

त्यांना लगेच येथील लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले व तेथून पुढील उपचारासाठी अकोल्याला हलविण्यात आले. कार चालक आरोपी फरार असून ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एएसआय नागोराव भांगे पुढील तपास करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!