Join WhatsApp group

Ads

ऋषी आनंदवन संस्थेला – ग्रीन आयडियल अ‌वार्ड

By Sarkarmzanews

December 5, 2024 8:48 pm

Ads

न्यूज डेस्क : पुणे, दिनांक ०५ : जयपुर येथे राष्ट्रीय ट्रिमॅन विष्णूजी लांबा यांच्या श्री कल्पतरू संस्थांन तर्फे संपूर्ण भारतातील पर्यावरण प्रेमी व त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रमुख संस्थांना ग्रीन आयडियल अ‌वार्ड या कार्यक्रमासाठी जयपूर येथील इंदिरा गांधी पंचायती राज संस्थान या सरकारी भव्य दिव्य सभागृहात आमंत्रित करण्यात आले होते.

ह्या कार्यक्रमास राजस्थानचे महामहिम राज्यपाल मा.हरिभाऊजी बागडे, भारत सरकारचे केंद्रीय मंत्री एग्रीकल्चर अँड फार्मर्स वेल्फेअर मा. भगिरथजी चौधरी,मा.मदनजी मेघीवाल व महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच तेलंगणाचे मा.राज्यमंत्री संतोषकुमार राजस्थानच्या शिक्षण मंत्री मंजुलाजी शर्मा, जयपुर कलेक्टर आदि सर्व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात उपाध्याय प्रवर प्रवीणऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने पुण्याच्या जवळ हडपसर येथील *ऋषी आनंदवन* या संस्थेचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेला राष्ट्रीय त्रिमूर्ती चे चिन्ह असलेला स्तंभ व मानपत्र सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी ऋषी आनंदवन तर्फे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा कार्याध्यक्ष प्रमोद छाजेड यांनी हा सन्मान स्वीकारला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!