Join WhatsApp group

Ads

धाबा येथे भोंदू बाबाचा सुळसुळाट

By Sarkarmzanews

December 12, 2024 10:08 am

Ads

न्यूज डेस्क : दिनांक १३ : आपल्या सुशिक्षित महाराष्ट्र राज्यात अनेक भोंदू बुवा व बाबांनी लोकांची फसवणूक केल्याचे आपण अनेक किस्से बघितले असेल, दुर्गम भागात जिथे आरोग्य व शिक्षणाचा अभाव आहे अश्या भागात यांची दुकानदारी खूप वेगाने चालत असते. हे आपण समजून घेऊ शकतो, पण मात्र अकोला जिल्हा हा परिपूर्ण असतना सुद्धा बार्शीटाकळी तालुक्यात धाबा या गावात स्वताला नवनाथाचा आशीर्वाद प्राप्त असल्याचे सांगत एक ढोंगी सध्या बाबा खूप चर्चेत आहे.

तुमच्यावर अघोरी शक्ती चा दुष्प्रभाव असो किंवा आरोग्यविषयक काही पिढा, जमिनितून धन काढायचे असेल किंवा भूतप्रेत बाधा प्रेमी युगलांना लग्न करायचे असेल किंवा कुठल्या स्त्रीला आकर्षित करायचे असेल किंवा मुलबाळ हवे असेल तर अश्या खूप समस्यांचे इलाज या बाबा जवळ असल्याचे दावा हा भोंदू बाबा करीत असतो. या बाबाने लोकांना भोंदू बनून खूप अमाप संपत्ती जमा केली आहे.

तसेच हा बाबा एका शासकीय शाळेवर कामाला असून त्याने आपली प्रसिद्धी लुटण्यासाठी व पैशाचा लालसे पोटी हा बाबा आपला धंधा जोऱ्यात चालवताना दिसत आहे. काही नागरिकांनी याची तक्रार करण्याचे ठरविले होते पण काही स्थानिक राजकारणी नेत्यांना हाताशी घेऊन या प्रकरणातून बाहेर पडल्याची चर्चा सध्या बार्शिटाकळी तालुक्यात रंगली आहे.

पुढच्या भागात विडीओच्या माध्यमातून याची पोलखोल करण्यात येईल.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!