Join WhatsApp group

Ads

अटल फाउंडेशन विदर्भ विस्तारक पदी दिल्ली येथे विष्णू लोडम यांची निवड आमदार माननीय श्री हरीश पिंपळे यांनी शाल श्रीफळ देऊन केला सत्कार

By Sarkarmzanews

December 25, 2024 7:49 pm

Ads

मुर्तीजापुर प्रतिनिधी-अटल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य विदर्भ विस्तारक पदावर मूर्तिजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम यांची दिल्ली येथे नियुक्ती करण्यात आली ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून केलेले शेकडो सामाजिक उपक्रमांची दखल घेत अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंग यांच्या आदेशानुसार दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालय येथे आयोजित अटल सन्मान समारोह 2024 कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश राजे यांनी त्यांची निवड करून तसेच त्यांच्या निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती अपर्णा सिंह त्रिपाठी महामंडलेश्वर आचार्य ओझाजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश राजे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल श्रीराम कुलथिया सुनील यादव राष्ट्रीय महामंत्री रमेश भुतडा बबली त्यागी राष्ट्रीय मंत्री जयवीर सिंह कुलदीप शर्मा आधी पदाधिकारी उपस्थित होते मूर्तिजापूर येथे माननीय आमदार श्री हरीश भाऊ पिंपळे यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन विष्णू लोडम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा शहराध्यक्ष रितेश सबाजकर समाजसेवक कमलाकर गावंडे गजानन नाकट हर्षल साबळे नितीन शिंदे राजू कांबे तुषार जोगदंड सुधीर दुबे व समस्त पदाधिकारी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!