Join WhatsApp group

Ads

--

अकोला शहराची बाजारपेठ झोपडपट्टी दादाने हादरली; व्यापाऱ्यांचे निवेदन, मात्र पोलिसांची कारवाई कुठे?

By Sarkarmzanews

September 22, 2026 6:24 pm

Ads

अकोला : जुना दाना बाजार परिसरातील व्यापाऱ्यांकडून हफ्तेखोरी केल्याचा आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करत अकोला म्युनिसिपल प्लॉट होल्डर्स लोकल मर्चंट्स असोसिएशनने पोलिस अधीक्षकांकडे दिनांक १७ सप्टेंबर रोजी निवेदन दिले आहे.

मात्र, व्यापाऱ्यांनी एवढे गंभीर आरोप केल्यानंतरही पोलिस प्रशासनाची पुढील भूमिका काय? कारवाई झाली असेल तर ती नेमकी कोणती आणि नसेल तर असा सवाल आता व्यापारी वर्गातून उपस्थित होत आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनात मो. जुनेद रा. नायगाव यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. संबंधित व्यक्तीविरुद्ध पूर्वी गुन्हे दाखल असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.

व्यापाऱ्यांना धमकावणे आणि पैशांची मागणी करण्यासारख्या आरोपांची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

मात्र येथेच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो—

व्यापाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतल्यानंतर पुढे काय झाले?

तक्रारीची नोंद झाली का?

संबंधित पोलिस ठाण्याने चौकशी सुरू केली का?

सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले का?

व्यापाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले का?

आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी कोणती कारवाई झाली?

की निवेदन स्वीकारून प्रकरण कागदावरच थांबले?

व्यापारी वर्गासाठी बाजारपेठ ही उपजीविकेची जागा आहे. त्यामुळे धमकी अथवा खंडणीसारख्या तक्रारी असल्यास त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आणि दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, निवेदनातील आरोप अद्याप तपासातून सिद्ध झालेले नसल्याने संबंधित व्यक्तीची बाजू आणि पोलिसांची अधिकृत भूमिका समोर येणेही तितकेच आवश्यक आहे.

सरकार माझा न्यूजचा थेट सवाल :

व्यापाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करूनही जर कारवाईची माहिती सार्वजनिक होत नसेल, तर व्यापाऱ्यांनी आता न्यायासाठी नेमके कोणाकडे पाहायचे?

अकोला पोलिस प्रशासन या गंभीर आरोपांची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणार का, याकडे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

न्यूज फोटो – Ai Genrated

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!