Join WhatsApp group

Ads

--

दोनद येथे अंघोळीसाठी गेलेल्या ३८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून अंत

By Sarkar Maza

June 27, 2026 4:58 pm

Ads

मूर्तिजापूर, दि. २७ : मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गायरान येथील रहिवासी ज्ञानेश्वर दादाराव सोळंके (वय ३८) यांचा दोनद येथील नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सोळंके हे नातेवाईकांच्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी दोनद येथे देवीचा मंदिरावर आले होते.

कार्यक्रमादरम्यान ते नदीत अंघोळ करण्यासाठी गेले असता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व पोहताना दम न धरल्यामुळे ते पाण्यात बुडाले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने अथक प्रयत्न करून ज्ञानेश्वर सोळंके यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत ज्ञानेश्वर सोळंके यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!