Join WhatsApp group

आमदार हरीश पिंपळे यांनी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त करत बिहारच्या जनतेचे मानले विशेष आभार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर : १४ नोव्हे. २५ :बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेला हा दणदणीत विजय हा प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा, मुख्यमंत्री मा. श्री नितीश कुमार यांच्या अनुभवी मार्गदर्शनाचा आणि सर्व मित्रपक्षांच्या एकजुटीचा ठोस पुरावा मानला जात आहे. राज्यातील जनतेने दिलेला एकमुखी कौल हा विकास, स्थैर्य, सुशासन आणि सकारात्मक राजकारणावरचा विश्वास अधिक बळकट करणारा ठरला आहे.

या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केलेले क्रमांक एकचे नेतृत्व, कार्यकर्त्यांची अविरत मेहनत, संघटनेची काटेकोर तयारी, तसेच जनतेचा अफाट आशीर्वाद—यांच्या जोरावर हा विजय शक्य झाल्याचे आमदार हरीश पिंपळे कडून सांगितले जात आहे.

भाजप-मित्रपक्षांचा हा दमदार विजय बिहारसाठी नवे संकल्प, नवी ऊर्जा आणि प्रगतीचा अधिक वेगवान मार्ग निश्चित करणारा ठरणार आहे. पुढील काळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत सर्वसमावेशक, पारदर्शक आणि सुशासित बिहार घडविण्यासाठी सत्ताधारी आघाडी निर्धाराने कार्यरत राहील, असा विश्वास आमदार हरीश पिंपळे यांनी व्यक्त केला आहे.

या भव्य विजयाबद्दल आमदार हरीश पिंपळे यांनी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त करत बिहारच्या जनतेचे विशेष आभार मानले आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!