Join WhatsApp group

Ads

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अटक मुर्तिजापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई

By Sarkar Maza

May 29, 2026 10:08 am

Ads



मुर्तिजापूर city पोलिसांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्पर तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


पोलीस स्टेशन मुर्तिजापूर शहर येथे अपराध क्रमांक ४९३/२०२६ अंतर्गत भा.न्या.सं. कलम १३७(२), ६४(१), ६४(२)(१), ६९, ७५(१)(i), ८७, ३५१(२) तसेच पोक्सो कायदा कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी दामोदर महादेव सुरकर (वय ६०, रा. रामकोरी वार्ड, पवनी ता. पवनी जि. भंडारा) असून आरोपीचे नाव जितेश पद्माकर हॅड (वय ३४, रा. बर्डे प्लॉट, अंजनगाव रोड नाका नं. ४, अकोट) असे आहे.


रेल्वे स्टेशनवरून फूस लावून नेल्याचा आरोप


मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलगी ही मुर्तिजापूर रेल्वे स्टेशन परिसरातून बेपत्ता झाली होती. तपासादरम्यान रेल्वे पोलीस व आर.पी.एफ. यांच्या मदतीने स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम अकोट शहरात शोधमोहीम राबवून नंतर अकोला शहरातून पीडित मुलीला ताब्यात घेतले.


पीडित मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, एका अनोळखी इसमाने तिला फूस लावून अकोट येथे नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानंतर गुन्ह्यात आणखी गंभीर कलमांची वाढ करण्यात आली.


तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी जेरबंद


सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयित आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे (अकोट ग्रामीण) तसेच अकोट शहर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. अखेर आरोपी जितेश हॅड याला दि. २७ मे २०२६ रोजी अकोट येथून अटक करण्यात आली.
सध्या आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून पुढील तपास पोउपनि नितीन राठोड करीत आहेत.


वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही संपूर्ण कारवाई
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,


अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी,


उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे


यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

पोनि अजित जाधव, पोनि किशोर जुनघरे, पोउपनि आशिषी, पोउपनि नितीन राठोड, स.फौ. सुरेश पांडे, पोहेकाॅं सचिन दांदळे, पोकॉं गजानन खेडकर, पोकॉं सचिन दुबे, पोकॉं पवन बाडखे तसेच अकोट शहर/ग्रामीण पोलीस व आर.पी.एफ. स्टाफ यांनी सहभाग घेतला.\

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!