Join WhatsApp group

Ads

-

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

By Sarkar Maza

June 3, 2026 12:26 am

Ads

मुर्तिजापूर : मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांची बदली झाल्याची बातमी समोर येताच शहरातील अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखली नाही, तर जनतेच्या मनातही आपले वेगळे स्थान निर्माण केले.

अनेकांसाठी ते केवळ एक पोलीस अधिकारी नव्हते, तर अडचणीच्या काळात आधार देणारे, समस्या समजून घेणारे आणि न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. सर्वसामान्य नागरिक असो, व्यापारी असो किंवा सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येकाशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला.

त्यांच्या कार्यकाळात मुर्तिजापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असो किंवा एखाद्या नागरिकाची वैयक्तिक अडचण, जाधव यांनी नेहमीच समंजसपणे आणि सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे पोलीस व जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला.

“अधिकारी म्हणून आले आणि मित्र म्हणून निघून जात आहेत,” अशी भावना अनेक नागरिकांसह शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. आपल्या कार्यकाळात त्यांनी जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करत प्रत्येक समस्येकडे संवेदनशीलतेने पाहिले. त्यामुळे केवळ पोलीस अधिकारी म्हणून नव्हे, तर एक विश्वासू मित्र आणि आधारवड म्हणून त्यांनी मुर्तिजापूरकरांच्या मनात स्थान मिळवले. त्यांच्या बदलीची बातमी समोर येताच अनेक नागरिक व ज्येष्ठ नागरिकांनी हळहळ व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आज ते नव्या जबाबदारीसाठी रवाना होत असले तरी त्यांनी आपल्या कामातून आणि स्वभावातून कमावलेला जनतेचा स्नेह कायम राहणार आहे. त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी उत्तम आरोग्य, यश आणि उज्ज्वल भविष्यासाठी मुर्तिजापूरकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

“पोलीस खात्यात अधिकारी अनेक येतात आणि जातात; पण काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्यामुळे आणि माणुसकीमुळे कायम स्मरणात राहतात. अजित जाधव हे त्यापैकीच एक नाव आहे.”

बदली ही सेवेतली परंपरा असली तरी मनाला ती मान्य होत नाही, अजित जाधव साहेबांसारखा मित्र पुन्हा भेटेल की नाही, याची खात्री वाटत नाही…

“ठाणेदार अजित जाधव यांना सरकार माझा न्यूजचा सलाम”…

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!