Join WhatsApp group

Ads

पनवेलमध्ये उभ्या ट्रकला रिक्षाची धडक; अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

By Sarkar Maza

May 29, 2026 9:56 am

Ads

पनवेल | प्रतिनिधी | श्रीनाथ लाड |वाहनातील डिझेल संपल्याने पार्किंग लाईट न लावता रस्त्यात उभ्या केलेल्या ट्रकला पाठीमागून रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री हा अपघात जुना पुणे-बेंगळूर महामार्गावरील आजीवली ब्रिजजवळ, कोनगाव येथे पुणे लेनवर घडला. मोरेश्वर अनंता सोनावळे (रा. ठोंबरेवाडी, पोयंजे) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.
याप्रकरणी निष्काळजीपणे ट्रक उभा करणाऱ्या चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रकचे डिझेल संपल्याने तो जुना पुणे-बेंगळूर हायवेवरील आजीवली ब्रिजजवळ रस्त्यातच उभा केला होता. मात्र, रात्रीच्या किंवा अंधाराच्या वेळी मागून येणाऱ्या वाहनांना अंदाज यावा यासाठी कोणतीही पार्किंग लाईट अथवा धोक्याचा इशारा देणारे संकेत ट्रकला लावण्यात आले नव्हते.

या दरम्यान रिक्षाचालक मोरेश्वर सोनावळे हे आपल्या रिक्षासह या मार्गावरून जात असताना, त्यांना रस्त्यात थांबलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांची रिक्षा थांबलेल्या ट्रकवर पाठीमागून जाऊन प्रचंड वेगाने धडकली. या भीषण अपघातात सोनावळे यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अपघातानंतर पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रस्त्यावर निष्काळजीपणे व धोकादायकरित्या वाहन उभे करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पनवेलमध्ये उभ्या ट्रकला रिक्षाची धडक; अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

पनवेल | प्रतिनिधी|श्रीनाथ लाड|वाहनातील डिझेल संपल्याने पार्किंग लाईट न लावता रस्त्यात उभ्या केलेल्या ट्रकला पाठीमागून रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री हा अपघात जुना पुणे-बेंगळूर महामार्गावरील आजीवली ब्रिजजवळ, कोनगाव येथे पुणे लेनवर घडला. मोरेश्वर अनंता सोनावळे (रा. ठोंबरेवाडी, पोयंजे) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.
याप्रकरणी निष्काळजीपणे ट्रक उभा करणाऱ्या चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रकचे डिझेल संपल्याने तो जुना पुणे-बेंगळूर हायवेवरील आजीवली ब्रिजजवळ रस्त्यातच उभा केला होता. मात्र, रात्रीच्या किंवा अंधाराच्या वेळी मागून येणाऱ्या वाहनांना अंदाज यावा यासाठी कोणतीही पार्किंग लाईट अथवा धोक्याचा इशारा देणारे संकेत ट्रकला लावण्यात आले नव्हते.

या दरम्यान रिक्षाचालक मोरेश्वर सोनावळे हे आपल्या रिक्षासह या मार्गावरून जात असताना, त्यांना रस्त्यात थांबलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांची रिक्षा थांबलेल्या ट्रकवर पाठीमागून जाऊन प्रचंड वेगाने धडकली. या भीषण अपघातात सोनावळे यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अपघातानंतर पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रस्त्यावर निष्काळजीपणे व धोकादायकरित्या वाहन उभे करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!