Join WhatsApp group

मुर्तीजापूर निवडणूक : महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता वाढली नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी साठी विनायकराव गुल्हाने नावाला वेग

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर :१४ नोव्हें.२५ : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष — काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) — हे एकत्र येण्याची शक्यता अधिक मजबूत होत आहे.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका आणि गोपनीय चर्चांमुळे आघाडीची दिशा स्पष्ट होत असून, एकत्रित लढतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील मतांचे विभाजन टाळून भाजपसमोर मजबूत संघटित पॅनेल उभे करण्याचा हेतू असल्याने आघाडीचे सर्व घटक पक्ष “विन-विन” सूत्रावर एकमत साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी विनायकराव गुल्हाने यांचे नाव सर्वाधिक अग्रस्थानी असून, त्यांच्या सभागृहातील ओळख, मतदारांशी असलेली जवळीक आणि अलीकडील दौऱ्यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे चर्चा आणखी वेगात आहे.

पक्षांतर्गत पातळीवर काही जागांवर समन्वयाचा तणाव असला तरी, सर्वच पक्षांना एकत्र येणे हा सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक फायदेशीर पर्याय वाटत असल्याचे बोलले जात आहे.

पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या बैठकांचे वेळापत्रक ठरले असून, अंतिम निर्णयाची घोषणा कधीही होऊ शकते.

या हालचालीमुळे मुर्तीजापूरमधील निवडणूक समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, राजकीय वातावरणाला अचानक तापमान आले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!