Join WhatsApp group

मूर्तीजापूर नगरपरिषद निवडणुकीत ‘नारी शक्ती’ची झळाळी! प्रभाग १२ मध्ये सौ. सुनिता विष्णू लोडम समाजसेवा आणि प्रामाणिकपणाची ओळख

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तीजापूर : १२ नोव्हे. २५ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत मूर्तीजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून प्रत्येक प्रभागात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. अशा वेळी प्रभाग क्रमांक १२ मध्ये सौ. सुनिता विष्णू लोडम यांचे नाव सध्या जनतेच्या चर्चेत आहे.

कोणताही राजकीय वारसा नसताना सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या नारी शक्तीने जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. सौ. सुनिता लोडम या केवळ समाजसेविका नाहीत, तर जनतेच्या प्रत्येक अडचणीसाठी तत्पर उभ्या राहणाऱ्या एक तळमळीच्या महिला कार्यकर्त्या आहेत.

कोविड काळात त्यांनी आणि त्यांच्या कार्यसंघाने “कोरोना योद्धा” म्हणून समाजासाठी दिलेले योगदान आजही स्मरणात आहे. गरजू नागरिकांना रेशन, औषधे, रुग्णवाहिका सेवा, रक्तदान शिबिरे, आणि लसीकरण मोहिमा — हे सर्व त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने उभे केले. त्यांच्या या परिश्रमाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी अभयमित मोहिते यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्थापन केलेल्या ‘ज्ञाननर्मदा बहुदेशीय संस्था’तर्फे अनेक जनहितकारी उपक्रम राबवले जात आहेत. गरीब आणि निराधार मुलांसाठी ‘किड्स स्कूल’ सुरू करून शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘सुनिता विष्णू लोडम यांनी वुमन्स फाउंडेशन’ची स्थापना करून खऱ्या अर्थाने ‘नारी शक्ती’चा आवाज बुलंद केला.

‘राजमाता जिजाऊ जयंती व्याख्यानमाला’, ‘कोविड काळातील आधारगृह’, आणि शासकीय ‘शिवभोजन’ यांसारख्या प्रकल्पांत त्यांच्या नेतृत्वाने समाजात सकारात्मक परिवर्तन घडवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘प्रबुद्ध रत्न अवॉर्ड – दिल्ली २०२०’, ‘अटल फाउंडेशन गौरव पुरस्कार’, आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक राष्ट्रीय एकता पुरस्कार (संकल्प ट्रस्ट पुणे)’ यांसारखे प्रतिष्ठित सन्मान संस्थेला मिळाले आहेत.

आज मूर्तीजापूरच्या जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे —
“राजकारणात गटबाजी आणि पैशांचा खेळ सुरू असताना, खऱ्या नारी शक्तीचे प्रतीक असलेल्या सौ. सुनिता विष्णू लोडम यांना पक्ष न्याय देईल का?”

त्यांचा प्रामाणिकपणा, निष्ठा, आणि जनतेशी असलेली नाळ — हेच त्यांचे खरे बळ आहे.
नगरपरिषद निवडणुकीत ही नारी शक्ती समाजसेवेतून राजकारणात न्याय मिळवते का, याकडे आता संपूर्ण मूर्तीजापूरचे लक्ष लागले आहे.

जनतेचा प्रश्न : खऱ्या नारी शक्तीला राजकीय न्याय मिळेल का?


Share

Leave a Comment

error: Content is protected !!