Join WhatsApp group

मुर्तिजापूर भूमी अभिलेख कार्यालयात रंगा-बिल्ला-छगन जोडीचा धुमाकूळ- खुलेआम लाचखोरी? “पाकीट उघडा, नाहीतर फाईल हलणार नाही!”

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर (दि.९ नोव्हे.) — मुर्तिजापूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय आज भ्रष्टाचाराचे बालेकिल्ले बनले आहे. येथे “रंगा-बिल्ला-छगन ” नावाने ओळखली जाणारी जोडी इतकी दादागिरी दाखवत आहे की, साधं नाव फेरफार असो वा सीमांकन — पैसे दिल्याशिवाय एकही काम हलत नाही!

नागरिक, शेतकरी, विधवा महिलांपासून ते निवृत्त व्यक्तींपर्यंत सर्वजण या भ्रष्ट जोडीच्या त्रासाला कंटाळले आहेत. विशेष म्हणजे, स्वतः कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईक देखील काम करवून घेण्यासाठी पाकीट उघडल्याशिवाय सुटका नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


“आमच्याकडून दस्तऐवज पूर्ण असतानाही मुद्दाम फाईल थांबवली जाते. जोपर्यंत ‘रकमेची भाषा’ बोलत नाही, तोपर्यंत स्वाक्षरी होत नाही,” असे काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

एक वेळेस तर लोकप्रतिनिधीचा स्वीय सहायकाला सुद्धा या बहादूर अधिकार्याने “लाच घेतल्या शिवाय मी कोणाचा बापाचा काम करत नाही” असे खडे बोल सुनविले होते.

भूमी अभिलेख कार्यालयात ‘रंगा-बिल्ला-छगन’चे राज्य चालत आहे का?
या तिघांचा प्रभाव इतका वाढला आहे की, वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा गप्प आहेत. कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनाही या जोडीचा ‘हिस्सा’ देण्याची वेळ आली आहे, अशी धक्कादायक चर्चा सुद्धा सुरू आहे. “भूमी अभिलेख कार्यालयात काही अधिकारी स्वतच दलाल झाले आहे का ?असा प्रश्न विचारण्याची सध्या वेळ आली आहे.

या बहादुर कर्मचार्याचे अनेक किस्से आहे. पार्ट -२


Share

Leave a Comment

error: Content is protected !!