Join WhatsApp group

राज्यातील ५ हजार ४५९ पोलिसांना “हक्काच्या घराचे” स्वप्न,शासनाने दिली १७६८ कोटींच्या डीजी लोन निधीस मंजुरी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुंबई – दिनांक ०७ : राज्यातील पोलीस अंमलदारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न अखेर सुटला आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने डीजी लोन (पोलीस गृहबांधणी अग्रीम) योजनेसाठी तब्बल १७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे राज्यातील ५ हजार ४५९ पोलीस अंमलदारांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिस दलातून आ. मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पोलिस कर्मचाऱ्यांचे डीजी लोन अर्ज प्रलंबित होते. शासनाकडे राज्यभरातून ४ हजार ७११ तर मुंबईतून ७४८ असे अर्ज आले होते. राज्यातील अर्जांसाठी १२५५ कोटी ८७ लाख, तर मुंबईतील अर्जांसाठी २१२ कोटी २० लाख रुपयांची आवश्यकता होती. अखेर शासनाने या सर्व अर्जांसाठी निधी मंजूर केला आहे.

डीजी गृहकर्ज योजना ही पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, या योजनेद्वारे पात्र पोलिस कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या १२५ टक्के इतके कर्ज थेट पोलिस गृहविभागाकडून मिळते. ज्या अधिकारी व अंमलदारांकडे स्वतःचे घर नाही, त्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी ही योजना राबविली जाते.

या निर्णयाबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले, तर राज्यातील पोलिस दलाने मुनगंटीवार यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या संवेदनशीलता, तत्परता आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पोलिसांच्या हक्काचा प्रश्न मार्गी लागला, अशी भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!