Join WhatsApp group

Ads

-

आझाद हिंद एक्सप्रेसला तब्बल १० तासांचा विलंब अकोल्यातील प्रवाशांचे हाल

By Sarkarmzanews

June 2, 2025 7:10 pm

Ads

गेल्या ७ दिवसांपासून ९.५३ तास, तर महिन्यात सरासरी ८.४ तास विलंब!

अकोला, २ जून: हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस (१२१३०) च्या विस्कळीत वेळापत्रकामुळे अकोला जंक्शनवर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असताना, ही गाडी आज तब्बल १० तास ४० मिनिटे उशिराने अकोला स्थानकावर पोहोचली.मूळतः ३१ मे रोजी हावडा येथून सुटणारी ही गाडी १ जून रोजी पहाटे ०५:१६ वाजता सुटण्यासाठी पुनर्निर्धारित (reschedule) करण्यात आली होती.

अकोल्यात १ जून रोजी सायंकाळी १९:३७ वाजता पोहोचणे अपेक्षित असताना, ही गाडी आज २ जून रोजी पहाटे ०६:१७ वाजता पोहोचली. यामुळे प्रवाशांना सुमारे १०:४० तासांचा विलंब सहन करावा लागला.ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या सात दिवसांपासून ही गाडी सरासरी ९.५३ तास उशिराने धावत आहे, तर या महिन्याची सरासरी ८.४ तास विलंब आहे.अकोल्याहून पुण्याला जाण्यासाठी दररोज फक्त तीन आणि काही साप्ताहिक गाड्या उपलब्ध असल्याने, आझाद हिंद एक्सप्रेस ही प्रवाशांसाठी एक महत्त्वाची जीवनवाहिनी आहे.

वारंवार होणाऱ्या या विलंबामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे, विशेषतः उन्हाळ्याच्या गर्दीमुळे वाढलेल्या ट्रॅव्हलचे तिकीट दरांनी प्रवासी आधीच त्रस्त आहेत.प्रवासी आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाला या मार्गावरील गाड्यांची वक्तशीरता पूर्ववत करण्यासाठी आणि प्रवाशांची सोय सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!