Join WhatsApp group

Ads

--

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे ऑपरेशन ‘प्रहार’जोरावर … अवैधतेचा अंत, प्रहाराचा प्रारंभ

By Sarkarmzanews

May 29, 2025 7:53 pm

Ads

दिनांक २९ : अकोला : अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सोबतच अवैध धंद्यावर अंकुश लावण्यासाठी नव्याने रुजू झालेले पोलीरा अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी ‘ऑपरेशन प्रहार’ या विशेष मोहिमेची घोषणा केली आहे. ‘अवैधतेचा अंत, प्रहाराचा प्रारंभ’ या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा आरंभ करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक यांनी रुजू होताच जिल्ह्यातील विविध अवैध व्यवसायांवर लक्ष केंद्रित करून कठोर पावले उवलण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः गोवंश तस्करी, बेकायदेशीर वारू उत्पादन आणि विक्री, जुगार अड्डे, मटका, आणि अन्य प्रकारचे अवैध धंदे यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत जिल्ह्यात कोणतेही अवैध व्यवसारा सहन केले जाणार नाहीत, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर संबंधित यंत्रणांना कडक निर्देश देण्यात आले असून, नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दिनांक २८.०५.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख यांना दिलेल्या सुचना व निर्देशा प्रमाणे स्था. गुक्षा. येवील पथकाने धाम्णी पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगाव येथे अवैध जुगारावर रेड टाकण्यात आली, या कारवाईत वरली मटका खेळताना ०६ जनांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीसांनी घटनास्थळावरून वरली मटका खेळण्याचे साहित्य, रोख रक्कम २६,२९० रुपये, १,६०,००० रुपये किंमतीच्या तीन मोटरसायकल, २१,००० रुपये किंमतीचे तीन मोबाईल, ६,००० रुपये किंमतीच्या सहा प्लास्टिक खुर्च्या आणि १,००० रुपये किंमतीचे दोन प्लास्टिक पाण्याचे कॅन असा एकूण २लाख १४ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच पोलीस स्टेशन बार्शिटाकळी शहरातील जामा मशीद परिसरात राहणारा इसम नामे शेख शारीक हा गोवंश ची कत्तल करीत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने लागलीच पोलीस स्टेशन ला हजर असलेले अंमलदार यांच्या सह मिळालेल्या माहितीव्या ठिकाणी आयुन शहानिशा केली असता शेख शारीक हा कत्तल करीत असतांना मिळून आला. अंदाजे ३१० कीलो गोमांस किंमत ६३५७० रू था मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. दिनांक २५.०५.२०२५ रोजी गोवंश चोरी ब्या गुन्हयातील ०२ आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांचे कडुन ०१ गाय गुन्हयात वापरलेले वाहण असा एकुण २ लाख ६७ हजारावा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस दला कडून यापुढेही छापे टाकून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल. गोवंश तस्करीसाठी वापरले जाणारे वाहने जप्त करणे, बेकायदेशीर दारूच्या भ‌ट्ट्या उदरत करने, आणि अनेक जुगार अड्डयांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवायांमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन जनतेचा विश्वास वाढणार आहे.

या मोहिमेमुळे कायद्याचा धाक निर्माण होऊन अकोला जिल्हा अवैध धंदे मुक्त व सुरक्षित व्हावा, ही पोलीरा अधीक्षकांची भूमिका आहे. सर्वसामान्य नागरिकांनी अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवाया, पोलीस दलाशी सहकार्य करावे, आपल्या परिसरात अशा प्रकारचे गैरप्रकार दिसल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे. पोलीस विभागाच्या वतीने गागरिकांचा सहिष्य रहभाग आणि सहकार्य या मोहिमेस अधिक बल देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील जनतेस एक सुरक्षित, शांततामय आणि कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी ‘ऑपरेशन प्रहार हा एक महत्वाना टप्पा ठरणार आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!