Join WhatsApp group

दिव्यांग वडलाच्या होतकरू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी मदतीची गरज !

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १८ – अकोला (प्रतिनिधी) – “माझं स्वप्न आहे शिक्षण घेऊन मोठं होण्याचं… पण बाबा, तुम्ही मजुरी करून ती फी कशी भरणार?” – असं भावनिक म्हणणं आहे अकोल्यातील एका हुशार, होतकरू आणि अत्यंत गरजू विद्यार्थ्याचं. चिरंजीव श्री केशव कड, नोवेल स्कूल, अकोला येथून नववी उत्तीर्ण झालेला हा मुलगा, आज केवळ पैशा अभावी दहावीला प्रवेश मिळवू शकलेला नाही.


श्री च्या शिक्षणाच्या मार्गात अडथळा ठरत आहे रु. २०,०००/- इतकी थकीत शैक्षणिक फी, व पुढील दहावीची फी जी त्याच्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेता भरली जाणं अशक्यप्राय झालं आहे. परिणामी शाळा त्याला टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) देण्यास नकार देत आहे. पैसे दिल्याशिवाय टी.सी मिळणार नाही असे शाळेच्या प्रशासनाने सांगितले आहे आणि त्यामुळे श्री च पुढील शिक्षण अडकलं आहे.
श्री चे वडील शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असून, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मजुरी करून कसेबसे उदरनिर्वाह करतात. सध्या कुटुंब सूर्य विंग अपार्टमेंट, खडकी, अकोला येथे वास्तव्यास आहे. या कठीण परिस्थितीतही श्री ने हार न मानता नववी उत्तीर्ण केली, आणि त्याला दहावीचे शिक्षण पूर्ण करून उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे.


या पार्श्वभूमीवर, समाजसेवक गजानन हरणे यांनी समाजातील दानशूर नागरिकांना, सेवाभावी संस्थांना, शाळा व्यवस्थापनाला आणि प्रशासनाला भावनिक आवाहन केले आहे, की – “हा मुलगा पुढे जाऊन समाजासाठी दीपस्तंभ ठरू शकतो, पण आज त्याला शिक्षणासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. चला, आपण मिळून या स्वप्नांचे पंख तुटू देऊ नका.”

श्री सारख्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हे आपल्या सामाजिक जबाबदारीचे भाग आहे.
मदतीसाठी खालील माहितीचा आधार घ्यावा:

श्री केशव कड (विद्यार्थी) संपर्क: 7522919169

पत्ता: सूर्य विंग अपार्टमेंट, खडकी, अकोला

बँक तपशील:

Account Number: 40078918035

IFSC Code: SBIN0012015

बँक: स्टेट बँक ऑफ इंडिया

दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी या खात्यावर थेट मदतीची रक्कम जमा करून किंवा संपर्क साधून या होतकरू विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करावा, असे आवाहन समाजसेवक गजानन हरणे यांनी केले आहे.
“एक विद्यार्थी घडवणं म्हणजे एक समाज घडवणं आहे” – हे लक्षात ठेवून कृती करावी, हीच अपेक्षा.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!