Join WhatsApp group

Ads

महिला दिनानिमित्त आयोजित साडी वॉकेथॉन 2.0 ला मातृशक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Sarkarmzanews

March 10, 2025 9:40 am

Ads

दिनांक 10 : मुर्तीजापुर-येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामाजिक कार्यात अग्रेसर अटल फाउंडेशन अकोला ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था हॅपी वुमन्स क्लब ओम योग प्रतिष्ठान मूर्तिजापूर यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साडी वॉकेथॉन 2.0 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 9 मार्च रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अटल फाउंडेशन च्या राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णा सिंह त्रिपाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल कुलथिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश राजे यांनी अटल फाउंडेशन विदर्भ विस्तारक विष्णू लोडम यांना दूरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या व कौतुक केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजमाता मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा नेत्या सौ नूतन हरीश पिंपळे अटल फाउंडेशन अकोला जिल्हाध्यक्ष सौ रुपाली तिडके ज्ञान नर्मदा सामाजिक संस्था अध्यक्ष तथा विदर्भ विस्तारक अटल फाउंडेशन चे विष्णू लोडम हॅप्पी वुमन्स क्लबच्या सुनिता लोडम अटल फाउंडेशन कार्याध्यक्ष डॉ. स्वाती पोटे तालुका अध्यक्ष कविता साखरे शहराध्यक्ष माया दवंडे दिनेश श्रीवास युवती तालुका अध्यक्ष शिवकन्या शिवानी श्रीराव सोनल बांगड इत्यादी अटल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर वॉकेथॉन रॅलीला भाजपा नेत्या सौ नूतन हरीश पिंपळे , सौ शिल्पा तिडके तसेच अटल फाउंडेशनचे अकोला जिल्हाध्यक्ष सौ रूपाली तिडके यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

ही वॉकेथॉन रॅली छत्रपती शिवाजी चौक ते बी टी मॉल मार्गे जुना अकोला नाका व परत डीपी रोड तिडके नगर येथून आशीर्वाद लॉन येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता मासाहेब जिजाऊ व स्व. भारतरत्न मा. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली त्यानंतर तेजस्वी जगताप मुंबई वृत्तवाहिनी ब्युरो चीफ यांच्या मातोश्री उषा किर्दक यांचा सत्कार करण्यात आला.

दर्यापूर येथील पर्ल ओएस्टर स्कूलच्या महिला शिक्षक वृंदांनी सामाजिक नृत्यातून महिलांना साक्षर करून स्वालंबी बनण्याचा संदेश दिला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ दिपाली शेळके डॉ. पुजारी व कर्मचारी यांनी उपस्थित महिलांचे शुगर बीपी तपासून आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अटल फाउंडेशन हॅपी वुमन्स क्लब ओम योग फाउंडेशन सिटी टायकोंडो क्लब स्वच्छता अभियान मूर्तिजापूर यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिवकन्या शिवानी श्रीराव यांनी तर आभार कविता साखरे यांनी मानले

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!