Join WhatsApp group

अखंड सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ निवेदन सादर!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २९ : अकोला : अकोला जिल्ह्यातील अखंड सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणाला व मागण्यांना समर्थन म्हणून निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्या मार्फत प्रंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. गेल्या पाच दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून जरांगे यांचे आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.

माननीय जरागे पाटील यांची तब्येत खालावली असून डॉक्टरच्या टीमने त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. तो त्यांनी नाकारला आहे तरी शासनाने जरांगे पाटील यांच्या उपोषणाची त्वरित दखल घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा अन्यथा संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये मनोज जरागे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थन जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे अखंड सकल गरजवंत मराठा समाजाच्या वतीने राजेश देशमुख, गजानन हरणे, दादाराव पाथीकर, देवराव पाटील,बाळू ढोले पाटील, अण्णा देशमुख, संतोष वक्ते, अक्षय भांगे, संजय देशमुख, प्रशांत मगर, दिलीप देशमुख, संजय मालोकार, धनंजय देशमुख, पूजा मालोकार, प्रशांत देशमुख, गणेश मानकर, विपुल माने, बिज्रेस ठाकरे, शिल्पा व्हावळ ,आदी मराठा समाजाच्या प्रतिनिधी मंडळाच्या वतीने हे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मा. पंतप्रधान भारत सरकार वमा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना देण्यात येऊन त्यांच्या मार्फत मराठा आरक्षणासाठी उपोषणा करीता बसलेल्या मनोज जरांगे पाटलाच्या आमरण उपोषणाची, अन्नत्याग सत्याग्रहाची त्वरित दखल घेण्या बाबत विनंती करण्यात आली आहे.

सकल गरजवंत मराठा समाजाच्या वतीने या निवेदनाद्वारे मराठा आरक्षण प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबीत ठेवल्या जात आहे. अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, उपोषणे झाले. शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अनेकवेळा खोटे आश्वासन दिले. परंतु ते आश्वासन शासनाचा फुसका बार ठरले. त्यामुळे आता मराठा समाजाचा विशेषतः तरूणांचा संयम सुटला आहे. मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या दिनांक 25 जानेवारी 20225पासून उपोषण सुरू केले त्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची तब्येत बिघडलेली आहे त्यांना उपचार घेण्याचे डॉक्टरच्या चमूने सल्ला दिला आहे तरी तो त्यांनी नाकारला असून शासनाने या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे या अगोदर उपोषण सोडतांना हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्रांनी दिले होते.

परंतु तो सुध्दा फुसका बारच ठरला. त्यामुळे शासनाने मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. तो समाज शेतीवर आधारीत होता. पूर्वीची मोठ्या प्रमाणात असलेली शेती कमी-कमी होत आता 2 ते 5 एकरावर आली आहे. तसेच शेतीच्या पिकाला शासन खर्चावर आधारीत भाव देत नाही. त्यामुळे शेतकरी कुटूंबाला जगणे कठिण झाले आहे. तसेच तो आपल्या मुलाला उच्च शिक्षण सुध्दा देवू शकत नाही. शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही, नोकरी नसल्यामुळे लग्न नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा, कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. याला शासकीय धोरण व आरक्षण हे कारणीभूत असल्यामुळे मराठा समाजा हा ओबीसीच आहे.

त्याला त्वरीत ओ.बी.सी. मधून आरक्षण देणे गरजेचे असतांना सुध्दा शासन आरक्षण देत नाही. उलट त्या समाजाला क्रित्येक वर्षापासून झुलवित ठेवीत आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष पसरला आहे. त्याचा परिपाक म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला, आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. हा असंतोष शासनाने समजावून घेवून मराठा समाजाला त्वरीत आरक्षण देवून मनोज जरांगे पाटील यांचे पाच दिवसापासून सुरू असलेले उपोषण त्वरीत सोडवावे.

तसेच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशा प्रकारची मागणीची निवेदन बचाव संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सुद्धा देण्यात आले आहे. अन्यथा आम्ही सर्व अकोला जिल्ह्यातील मराठा बांधव मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणाच्या व मागण्यांच्या समर्थनार्थ जिल्हाभर जन आंदोलन करू याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील. असे निवेदनाद्वारे अखंड सकल गरजवंत मराठा च्या वतीने शासनास निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.



Share

Leave a Comment

error: Content is protected !!