Join WhatsApp group

Ads

-

मुर्तीजापुर तहसील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये श्री साईनाथ विद्यामंदिर गणेश नगर मुर्तीजापुर शाळेचा प्रथम क्रमांक

By Sarkarmzanews

January 28, 2025 10:30 pm

Ads

दिनांक २८ : मुर्तीजापुर : २६ जानेवारी २०२५ रोजी मुर्तीजापुर येथील तहसील ग्राउंडवर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील सर्व नामांकित शाळांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. कार्यक्रमांमध्ये मूर्तिजापूर गणेश नगर स्टिक श्री साईनाथ विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट आदिवासी नृत्य सादर केले.

विद्यार्थ्यांचा गणवेश व नृत्य हुबेहूब आदिवासींचे प्रतिनिधित्व करणारे होते नृत्यांमध्ये जननायक बिरसा मुंडा यांची जीवनकथा दाखविण्यात आली व पर्यावरण संतुलनाचा संदेश देण्यात आला. आदिवासी कार्यक्रमाचे सादरीकरण सर्वप्रथम श्री साईनाथ विद्यामंदिर येथे ध्वजारोहण होताच आदिवासी नृत्य उपस्थित मान्यवर व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित श्री आनंदरावजी मोरे सर माजी उपनगराध्यक्ष सुनील महादेवराव पवार तसेच स्थानिक रहिवासी व पालक यांच्यासमोर करण्यात आला.

त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार यांच्याकडून कार्यक्रमाला रोक बक्षीस देण्यात आले व कार्यक्रमाचे भरपूर कौतुक करण्यात आले. प्राथमिक गटातून आदिवासी नृत्य सादरीकरणाला तहसील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी शाळेचे मुख्याध्यापक महेश ठाकरे, शिक्षिका शितल राऊत, आरती दाबेकर, प्रगती भडांगे, जयश्री सावके, तसेच शिक्षक महेश खलेलकर, धीरज बैसवार, निखिल काकड, पंकज बरडे ,दिपाली ढेंगेकार, पायल अग्रवाल, अनुराधा सोनवणे व शिल्पा आष्टीकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले
संस्थेचे अध्यक्ष श्री नितीन मोरे व सचिव सौ अर्चना मोरे यांनी मुख्याध्यापक शिक्षा वृंद व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन प्रेरित केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!