Join WhatsApp group

Ads

चिंटू अस्वल आणि त्याचे घर – पुस्तकाचे प्रकाशन

By Sarkarmzanews

January 28, 2025 7:20 pm

Ads

दिनांक २८ : मूर्तिजापूर – येथील सृजन साहित्य संघ मूर्तिजापूर व्दारा आयोजीत लोट्स इंटरनॅशनल स्कूल, हरियानगर,मूर्तिजापूर येथे भरगच्च अशा साहित्यीक मान्यवर व रसिकांच्या सोबतीने पुस्तक प्रकाशन व भावपूर्ण कवितांची काव्यमैफल उत्साहात संपन्न झाली.सर्वप्रथम या कार्यक्रमात ग्रामगीता ग्रंथाचे पूजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लताताई किडे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार अविनाश बेलाडकर,गझलकार संदीप वाकोडे,कथाकार प्रमोद पंत,तथा कवयित्री प्रा.योगीता चिंचे लाभल्या होत्या.अध्यक्ष व अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यानंतर मूर्तिजापूर येथील साहित्यीक रवींद्र जवादे यांच्या चिंटू अस्वल आणि त्याचे घर या बालकथा संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रास्ताविकामध्ये रवींद्र जवादे यांनी कथासंग्रह निर्मीतीमागची भूमिका मांडली यानंतर अविनाश बेलाडकर यांनी रवींद्र जवादे यांच्या बालकथा छोट्या छोट्या वाक्यांतून संस्कार व मूल्य यांची पेरणी करून कथा सांगणाऱ्या आजीची भूमिका वठवतात असे प्रतिपादन केले तर संदीप वाकोडे,प्रमोद पंत तथा प्रा. योगीता चिंचे यांनी बालकथा संग्रहावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.अध्यक्ष लताताई किडे यांनी साहित्यीकांनी आपल्या गावाचा व आपल्याव्दारा निर्मित साहित्याचा सन्मान आपणच केला पाहिजे असे सांगीतले.

या कार्यक्रमात संस्कार भारती शाखेचे संजय फडणाईक,अविनाश बेलाडकर,मुकुंद दाणी डॉ.सुजाता मुलमुले,प्रमोद राजंदेकर,प्रमोद पंत यांनी रवींद्र जवादे यांचा सपत्नीक सत्कार केला.सदर कार्यक्रमाच्या टप्प्याचे सुत्रसंचालन दीपाली देशमुख व आभार विनोद महल्ले यांनी मानले.

यानंतर काव्यमैफलीला सुरुवात करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष म्हणून कैलास सोळंके,प्रमुख
अतीथी म्हणून कमलनारायण जयस्वाल,अकोला येथील कवी मोहन काळे हे लाभले होते.मिलिंद इंगळे,विष्णु लोडम,विलास वानखडे,रामकृष्ण आसरे,कमलनारायण जयस्वाल,विजय इंगळे,ज्ञानदेव भड,लक्ष्मण कुऱ्हेकर,सचिन तराळ,विलास निलखन,प्रशांत पंत,प्रमोद पंत,किशोर आष्टीकर, शैलेश गिरी,आमीर हुसेन,कल्पक कांबळे, गजानन चव्हाण,मोहन काळे तसेच निलिमा आष्टीकर,प्रा.योगीता चिंचे,विद्याताई गोसावी,प्रा.वर्षा कावरे,लता सोळंके यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास सोळंके यांनी कवींनी सादर केलेल्या रचनांवर चिंतनीय भाष्य करून अध्यक्षीय रचना सादर केली .

उपस्थित कवी व रसिकांनी सदर मैफलीचा भरभरून आनंद घेतला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल ढोकणे व आभार प्रदर्शन प्रा.वर्षा कावरे यांनी केले.’हीच आमची प्रार्थना ‘ने मैफलीचा शेवट झाला.

या कार्यक्रमास श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती लाभली होती. सदर मैफलीच्या सहआयोजनामध्ये गझलदीप प्रतिष्ठान,कलाविष्कार बहु.संस्था,नेहरू युवा मंडळ, ज्ञाननर्मदा बहु.संस्था,संस्कार भारती व जीगिषा महिला मंच,मूर्तिजापूर यांचे सहकार्य लाभले..


Related Article

मुर्तिजापूर बंदमध्ये शांततेला गालबोट; समाजकंटकांवर वरिष्ठ अधिकारी ‘सु-मोटोचा’ कारवाईची करण्याचा तयारी?

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली? एक महिना उलटला, निंभा अतिक्रमण प्रकरणात कारवाई शून्य!

मुर्तिजापूर बंदचा स्फोटक पर्दाफाश? गटबाजी? तोडफोड? आणि व्यापाऱ्यांच्या नुकसानीमागचे धक्कादायक चित्र

धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो– मुर्तीजापुरात गुंजला तरुणाईचा आवाज. विद्यार्थ्यांच्या मोर्चाने दणाणले शहर

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात सदार दाम्पत्याची याचिका फेटाळली

मास्टर डी. व्ही. व्ही. प्रसाद यांच्या उपस्थितीत तायक्वांडो बेल्ट परीक्षा पार पडली

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!