Join WhatsApp group

Ads

वृद्धाश्रमाच्या नावाने पैसे गोळा करणारी टोळी सक्रीय

By Sarkarmzanews

January 24, 2025 10:23 pm

Ads

दिनांक २४ : मुर्तीजापुर : मागील काही दिवसांपासून १० ते १५ वर्षे वयोगटातील काही मुली श्री. छत्रपती शिवाजी महाराज वृद्धाश्रम,शिवराणा गड, मुर्तिजापूर, जि. अकोला या वृद्धाश्रमाच्या नावाने ५०, १०० रुपये देणगी मागत असल्याचे आढळून आले आहे.

या मुलींचा व वृद्धाश्रमाचा काहीही संबंध नाही, त्यासंबंधीची रितसर तक्रार संस्था पोलिस स्टेशन, मुर्तिजापूर शहर येथे लवकरच करणार आहे.

वृद्धाश्रम परीवारातील कोणतेही सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी, लाभार्थी वृद्धाश्रमाच्या बाहेर कोठेही देणगी करीता फीरत नाहीत असे संस्था अध्यक्षाचे म्हणणे आहे.

वृद्धाश्रमाच्या नावाने देणगी मागायला आल्यास ९७६४४०३०३१, ७५८८६११५५५ या मोबाईल नंबरवर याबाबत त्वरीत माहिती द्यावी. कोणालाही वृद्धाश्रमास कोणत्याही प्रकारची देणगी द्यायची असल्यास वृद्धाश्रमात येवूनच रीतसर पावती घेऊन द्यावी. असे आव्हान संस्थे अध्यक्ष प्रमोद अवघाते पाटील यांनी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!