Join WhatsApp group

Ads

-

अकोला पोलीस घटकात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत १५ प्रशिक्षणार्थीना मा.पोलीस अधीक्षक याचे हस्ते नियुक्ती आदेश

By Sarkarmzanews

January 23, 2025 10:56 am

Ads

दिनांक २३ :अकोला : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय क. संकीर्ण २०२४/प्र. क९०/व्यशि-३, दि. ०९ जुलै, २०२४ अन्वये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४-२५ या वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने अकोला पोलीस घटकात दिनांक १८.०१.२०२५ रोजी २२ प्रशिक्षणार्थी यांची कागदपत्र पडताळणी व मुलाखत घेण्यात आली होती.

दिनांक २२.०१.२०२५ रोजी मुलाखतीमध्ये पात्र झालेल्या एकुण १५ प्रशिक्षणार्थी यांना मा. श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक, अकोला यांचे हस्ते विजय हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन व पोलीस दलाविषयी माहिती देऊन नियुक्ती पत्र देण्यात आले. सदर प्रशिक्षणार्थीना अकोला पोलीस घटकात प्रशिक्षणार्थी म्हणुन पुढील सहा महिण्याकरीता रुजु करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाला मा. श्री बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक अकोला, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्या.) श्री आनंद महाजन व १५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोहवा गोपाल मुकुंदे यांनी केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!