Join WhatsApp group

Ads

धारदार तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्यास युवकाला अटक

By Sarkarmzanews

January 23, 2025 8:55 am

Ads

दिनांक २३ : मूर्तिजापूर: शहरातील गजबजलेल्या डॉ.बाबासाहेब आबेडकर पुतळ्याजवळ ते जुना दर्यापूर मार्गावरील दीपक टी सेटर समोर एक युवक हातात धारदार तलवार घेऊन दहशत निर्माण करीत होता.

मूर्तिजापूरशहर पोलिसांनी २१ जानेवारी रोजी रात्री १३० वाजेदरम्यान त्या युवकाला जेरबंद केले प्राप्त माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आबेडकर पुतळा ते जुना दर्यापूर मार्गावरीलदीपक टी सेंटरसमोर आरोपी शेख शहबाज शेख अशापाक (२४) रा जुनी वस्ती खडकपुरा हा धारदार तलवार हातात घेऊन नागरिकात दहशत पसरवित असल्याची माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळताच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल रखी जाधव, नामदेव आहे हे घटनास्थळी रवाना झाले यावेळी आरोपी धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करीत असल्याचे दिसून आल्यावरून पोलिसांनी

आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद केले. याप्रकरणी आरोपी शेख शेख शहबाज शेख अशपाक याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्याध्या आदेशाचे उल्लंघन करणे तसेच ४. २५ शस्त्र अधिनियम १९५९ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणी पुढील तपास ठाणेदार अजित आधाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल नामदेव आढे, रवी जाधव, करीत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!