Join WhatsApp group

Ads

भूमिअभिलेख कार्यालयाच्या कारभाराला कंटाळून प्रजासत्ताकदिनी आत्मदहन !

By Sarkarmzanews

January 22, 2025 9:23 am

Ads

मूर्तिजापूर – स्थानिक उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात गत पाच वर्षांपासून उंबरठे झिजवूनही न्याय मिळाला नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभाराला प्रजासत्ताकदिनी कंटाळून आत्मदहन करणार असल्याचा इशारा एसडीओ यांना दिलेल्या निवेदनात त्रस्त माना येथील रहिवाशाने दिला आहे.

तालुक्यातील माना येथील रहिवासी उध्दव कोकणे यांना गावातीलच शिट नं. ५ मधील प्लॉट नं. ४६ व ५० वडिलोपार्जित प्लॉट मिळाला होता. याबाबत न्याय मागण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अकोला येथे प्रकरण दाखल होते.

यावर अधीक्षकांनी दिलेल्या निर्णयावर१९७० नुसार सदोष असलेले निर्णय रद्द करण्याचे आदेश उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर यांना देण्यात आले होते.

मात्र विरोधकांच्या आणि संबंधित अधिकाऱ्याच्या संगनमताने काहीतरी देवाण- घेवाण करून आदेश आजपर्यंत मिळाला नाही असे तक्रारीत तक्रारदारांनी नमूद केले आहे.

यावरून संबंधीत विभागाने वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करत केराची टोपली दाखवली आहे.

वारंवार चकरा मारून न्याय मिळत नसल्याने या कारभाराला कंटाळून प्रजासत्ताक दिनाला माना येथील उद्धव कोकणे हे भूमी अभिलेख कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!