Join WhatsApp group

Ads

-

महान येथे अवैध धंद्याना ऊत – पिंजर चे ठाणेदार गंगाधर दराडे साहेबांनी लक्ष देण्याची गरज, सुजाण नागरिकांची मागणी

By Sarkarmzanews

January 20, 2025 1:45 pm

Ads

दिनांक २० : महान प्रतिनिधी : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले महान येथे अनेक अवैद्य धंदे जोरात चालू आहेत, महान व परिसरातील खेड्यात बहुतांश मजूर वर्ग आहे. खेड्यापाड्या वरून लोक महान ला कामानिमित्त व मजुरी साठी येतात, येथे असणारे अवैध व्यवसाय खुलेआम चालू असल्याने शौकीनांची तर मज्जा सुरु आहेच.

महान येथे वरली, देशी विदेशी, व गावठी दारू जुगार असे अनेक अवैद्य धंदे महान सर्रास पद्धतीने खुले आम चालू आहेत . त्यामुळे ग्रामीण विभागातील लोक आपले पैसे अवैद्य या धंद्यामध्ये गमावत आहे, त्यामुळे अनेक गोरगरिबांचे पैसे हे वाईट मार्गाने व्यर्थ जात आहे, याचा त्रास त्यांचा कुटुंबाला भोगावा लागत आहे.

पोलीस प्रशासनाने अवैध व्यवसाय बंद केले तर लोकांचे पैसे या वाईट मार्गाने जाणार नाहीत. महान येथे अवैध व्यवसाय फोफावल्याने पोलीस प्रशासनावर गावातील सुजान व जेष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महान येथे वाढलेले अवैध व्यवसाय व त्यातून होणारी गोर गरीब मजुरांची लूट खूप मोठ्या चिंतेचा विषय बनली आहे.

तरी पोलीस प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. यावर पिंजर पोलीस स्टेशन चे ठाणेदार काय कार्यवाही करतात या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आमचे प्रतिनिधी यांनी पिंजरचे ठाणेदार यांच्याशी प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया आत्ता पर्यंत दिलेली नाही. या वरून संशयाची सुई पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांचा कडे फिरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!