Join WhatsApp group

Ads

खळबळजनक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

By Sarkarmzanews

January 17, 2025 7:01 pm

Ads

दिनांक १७ : बुलढाणा : अल्पवयीन मागासवर्गीय विद्यार्थिनीस बळजबरीने दुचाकीवर बसवून गावाबाहेरील एका लॉज वर नेत शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मेहकर परिसरात घडली आहे. यामुळे समाजमन हादरले आहे.

पीडिता शाळेत जात असताना आरोपी नेहमीच तिचा पाठलाग व बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची बालिकेवर वाईट नजर होती. घटना प्रसंगी त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने तिला धमक्या देत बळजबरीने मोटरसायकलवर बसवून गावाबाहेर बायपास वरील निवांत लॉजवर नेले.

एका खोलीत नेऊन तिच्या इच्छे विरोधात शारीरिक अत्याचार केले. याची वाच्यता कुठे केली तर ठार मारण्याची धमकीही दिली. पीडितेच्या तोंडी तक्रारी वरून मेहकर पोलिसांनी आरोपी मोहन उर्फ राज चव्हाण, (वय २० राहणार खंडाळा, तालुका मेहकर )तसेच ओम प-हाड (२०, रा. बाभुळखेड, ता. मेहकर) या दोघांविरोधात पोक्सो, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनेचे गंभीर्य आणि पोकसो, ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी नुसार या दुर्देवी घटनेचा तपास मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहे. या घटनेमुळे मेहकर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Related Article

राजकीय आरोप की आर्थिक वाद? मयूर काळे मारहाण प्रकरण चर्चेत

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या बस्तीतील नाला कचऱ्याने तुडुंब; सफाईच्या बिलांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांची तातडीने स्वच्छतेची मागणी!

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!