Join WhatsApp group

Ads

अ.विश्व गायत्री परिवार मुर्तिजापूर तर्फे २४ कुंडी गायत्री यज्ञचे भव्य आयोजन

By Sarkarmzanews

January 13, 2025 8:57 am

Ads

दिनांक १३ : मुर्तिजापूर – प्रतिनिधी : अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज हरिद्वार च्या मार्गदर्शनमध्ये मुर्तिजापूर शहरात तब्बल ७ वर्षा नंतर २४ कुंडी गायत्री महायज्ञाचे आयोजन दिनांक १४ ते १६ जानेवारी पर्यंत येथील अग्रसेन भवन मध्ये करण्यात आलेले आहे .
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य कलश यात्रा रविवार दिनांक १२ रोजी स्टेशन विभाग राम मंदिर येथून काढण्यात आली. शोभायात्रेत सर्व गायत्री परिजनांनी, तालुका प्रतिनिधींनी, जिल्हा परिजन मोठ्या संख्येत उपस्थित होते.
सलग तीन दिवस चालणाऱ्या या निःशुल्क आयोजनात गायत्री महायज्ञ सोबतच दीप यज्ञ, पुंसवन,जन्मदिवस, नामकरण ,अन्नप्राशन,विध्यारंभ, यदनोपवित, मुंडण, जावल,दीक्षा ई .विविध संस्कार आणि प्रवचन हरिद्वार वरून आलेली टोळी च्या मार्गदर्शनात संपन्न केले जातील .
सर्वांनी वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेऊन कार्य सफल करावे .
कार्यक्रमानिमित्त आदरणीय योगीराज बल्किजी यांच्यासह शांतिकुंज हरिद्वार येथील प्रतिनिधींचे अतिथीचे दिनांक 13 जाने.रोजी दुपारी मुर्तीजापुर येथे आगमन होत आहे.
‌ दिनांक १६ जानेवारी रोजी टोळी चे विदाई कार्यक्रम होऊन टोळी पातुर येथे प्रस्थान करेल तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गायत्री परिवार मुर्तिजापूर वतीने करण्यात आले आहे .

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!