Join WhatsApp group

Ads

एकाच दिवशी दोन जुगार अड्ड्या वर छापे – अकोला पोलीस उपविभागीय अधिकारी पथकाची उत्तम कामगिरी

By Sarkarmzanews

December 30, 2024 3:35 pm

Ads

अकोला : दिनांक 30 : अकोला शहरात अकोला पोलीस उपविभागीय पथकाने शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी शहरात छापे टाकून इतिहास रचला आहे.

शहरात दिनांक 29/12/2024 रोजी पो स्टे.खदान हद्दीतील अब्दुल्ला कॉलनी इथे नाल्या लगत खुल्या जागेत अकोला येथे खुल्या जागेत जुगार चालत असतानाची माहिती मिळाल्यानंतर धाड टाकत 1) बाबर खान अत्तर खान 2) शेख शाहरुख शेख जमीर 3) मोहम्मद अकबर मोहम्मद इब्राहिम 4)अफाज खान यांना अटक केली तसेच बाकीचे आरोपी घटना स्थळावरून पोलिसांना पाहून पळाले खान यांच्या जवळून नगदी रोख रक्कम,7190/- मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण 28,390/- रु मुद्देमाल जप्त केला. व पुढील करवाई साठी पो. स्टे.खदान अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच पो स्टे.जुने शहर हद्दीतील सोनटक्के प्लॉट खुल्या जागेत जुगार वर धाड टाकून तीन आरोपींवर कारवाई केली १) चंद्रकांत बालमोहन वर्धावेकर २) मधुकर दत्तात्रय कानपुरे ३) शेख इम्रान शेख सलाम यांच्या जवळून नगदी रोख रक्कम१०,१६० वाहन, मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण ९०,१६०/- रु मुद्देमाल जप्त केला. व पुढील कारवाई साठी पो. स्टे.जुने शहर अकोला यांचा ताब्यात देऊन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

मा. सतीश कुलकर्णी अकोला पोलीस उपविभागीय अधिकारी यांचा मार्गदर्शनात PSI रत्नदीप पडसपगार HC अनिल खेडकर HC रवी गिवे HC विनय जाधव HC संदीप गुंजाळ NPC शेख नदीम PC राज चंदेल सदर कारवाई यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!