Join WhatsApp group

Ads

जुगार अड्ड्या वर पोलिसांचा छापा – एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

By Sarkarmzanews

December 28, 2024 12:20 pm

Ads

मुर्तीजापुर : दि.२८ : दिनांक २७ डिसेंबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान PSI आशिष शिंदे यांना वडरपुरा परिसरात एका घरात जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. तातडीने त्यांनी अनिल गुंजाळ यांचे घरी वडरपुरा येथे धाड टाकली असून नगदी 5200/-रु, होंडा कंपनीची सीडी डिलक्स 110 क्र एम एच 30 बी आर 70000/-रु दुचाकी, एमएच 30 बी के 4092 दुचाकी अंदाजे किंमत 90,000 रू, 5 मोबाईल एकुण कि 36,000/-रु, अशा एकुण मुद्देमाल 201,200रू घटनास्थळा वरून जप्त केला.

तसेच अनिल रामा गुंजाळ वय 50 वर्षों रा वडरपुरा , प्रतिक जयराम जाधव वय 42 वर्शे रा अनभोरा, शाहरूख हुसेन वय 26 वर्ष रा सोनोरी ता मुर्तिजापुर, मोहम्मद अतिक मोहम्मद युनुस वय 30 वर्ष रा सोनोरी, मुर्तिजापुर, धिरज सावलीया बोयत वय 44 वर्ष रा प्रतिक नगर ,मुर्तिजापुर यांचा वर कारवाई करत महाराष्ट्र जुगार अधीनीयम कायद्या अंतर्गत कलम 4,5 व अप नं. 579/2024 पंचा समक्ष गुन्हा दाखल केला.

सदर कारवाई ठाणेदार अजित जाधव यांचा मार्गदर्शनात PSI आशिष शिंदे, पोलीस कर्मचारी सतीश चाटे, विजय साबळे, यांनी कारवाई केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!