Join WhatsApp group

Ads

अकोला जिल्हा स्थानिक गुन्हेची धडक कारवाई – सरकार माझा न्यूज IMPACT

By Sarkarmzanews

December 25, 2024 4:20 pm

Ads

बोरगाव मंजू : दि.२५ : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत दाळंबी कोळंबी गावा जवळ राष्ट्रीय महामार्गावरील रॉयल ढाब्या वर अवैध्यरित्या पेट्रोल व डिजेलची खरेदी व विक्री सुरु आहे. पेट्रोल पंपाना ज्या गाड्या मार्फत डिजेल पेट्रोल पुरविला जातो त्या गाड्यांचा सोबत या ढाब्यावाल्याची चांगली जमत असून ते चालक या ढाब्या वर गाड्या थांबवितात व रात्रीचा अंधाराचा फायदा घेत रॉयल धाब्याचे मालक यांचा कडून यांचा गाड्यातील डिजेल पेट्रोल खाली करून घेतो. मुर्तीजापुर,बोरगाव मंजू, व ग्रामीण विभागात या डिजेल पेट्रोलची विक्री करतो.

हि बातमी सरकार माझा न्यूज ने २१ डिसेंबर २४ रोजी प्रसारित केल्या नंतर अकोला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत धडक कारवाई केली या मध्ये शेख नदीम शेख अहमद जवळून १०० लिटर डिजेल जप्त केले व पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला दिले आहे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!