Join WhatsApp group

Ads

अकोला शहरात सट्टेबाजीवर कोट्यवधीचे व्यवहार

By Sarkarmzanews

December 25, 2024 10:08 am

Ads

अकोला : दि.२५ : शहरातल्या सट्टेबाजी व्यवसायाचे काही पुरावे सरकार माझा न्यूज चा हाती लागले आहे या मध्ये नाव न सांगण्याचा अटी वरून एका उपबुकीने या व्यवसाय करणाऱ्यांचे सगळे पुरावे गोळा केले असून सरकार माझा न्यूज ला दिले आहे. या मध्ये त्यांचावर वचक ठेवणारी यंत्रणा यांचा संगनमताने कसा हा व्यवसाय चालतो त्याचे पुरावे दिले आहे. त्यांची शहानिशा करून त्याचे खुलासे सरकार माझा न्यूज youtube channal चा माध्यमातून VEDIO माध्यमातून लवकर करणार आहे.

सध्या अकोला शहरात क्रिकेट सट्टेबाजीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. शहरातील विविध ठिकाणी ४ मुख्य बुकींनी आपल्या अवैध्य व्यवसायासाठी खास हायटेक सेटअप उभारले गेले आहेत. कोट्यावधीचा खेळ शहरात सुरु असताना पोलीस प्रशासनाला न गुप्तचर यंत्रणेला याची माहिती नाही हे आश्चर्यकारक आहे.


क्रिकेट कडे खेळाच्या दृष्टीकोनातून पाहण्याऐवजी सट्टेबाज क्रिकेटमधून कोट्यवधीचे रुपयांची कमाई करत आहेत. सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये बिग बॉस क्रिकेट सामन्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. बिग बॉस क्रिकेट सामना पाहता सट्टेबाजांनी एक महिना आधीच आपले शहरात जाळे तयार करून ठेवले होते.

शहरातील उच्च भृ भागात फ्लॅट व घरे भाड्याने घेऊन हा सट्टा व्यापार जोरात सुरु आहे.

विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात चार मुख्य बुकी क्रिकेट वर संपूर्ण शहराचे सट्टयाचे पैसे खात आहे तर त्यांच्या हाताखाली काम करणारे 20 बुकी क्रिकेटवर लोकांन कडून सट्टा लावून घेत आहेत. मुख्य बुकींकडे शहरातील 100 हून अधिक नामी व्यावसाईक त्यांचे ग्राहक आहे तर छोटे बुकी सामान्य जनतेचा सट्टा घेत आहेत आणि इतर जिल्ह्यांन मध्ये सुद्धा यांचे जाळे पसरले आहे.

प्रत्येक चेंडूवर लाखो रुपयंचा सट्टा खेळला जातो. असे किती तरी चेंडूंचा हिशोब एका सॉफ्टवेअर माध्यामतून ठेवला जातो. संपूर्ण प्रक्रियेची योग्यरित्या नोंद या सॉफ्टवेअर मध्ये केली जाते जेणे करून सामना संपल्यानंतर, सट्टेबाजाकडून किती रक्कम घ्यायची व कोणाला किती परत द्यायची याचे हिशोब संगणकाचा एक बटन वर होतो.

सगळ्यांचे हार जीत चे पैसे दुसर्या दिवशी त्यांना दिले जाते. ग्राहकाने लावलेली सट्टेबाजीची रक्कम उपबुकी मार्फत वसूल व परतफेड केली जाते व दुसर्या जिल्ह्यातील पैसे हवाला मार्फत देवाण घेवाण होतो.

ग्राहक आणण्याच्या बदल्यात मुख्य बुकी छोट्या बुकीला कमिशन देतात. सट्टेबाजांकडून एक विशेष मोबाईल क्रमांक दिला जातो ज्यावर ग्राहक आपला सट्टा लावतो. क्रिकेट सट्टेबाजीचा खेळ इतका पारदर्शक आहे की यात हेराफेरीला वाव नाही.

संपूर्ण शहरात शेकडो पोलीस कार्यरत आहे एसडीपीओ पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि डीबी कर्मचाऱ्यांची प्रत्येक पोलीस स्टेशन ला टीम असून सुद्धा क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्टेबाजीची माहिती नसल्याने गुप्तचर यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे.

भाग २ – http://www.youtube.com/@SarkarMazaNews COMING SOON

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!