Join WhatsApp group

Ads

पोलीसांन वर हल्ला प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी!

By Sarkarmzanews

December 23, 2024 3:26 pm

Ads

ओम दाते (प्रतिनिधी : बार्शीटाकळी) : दिनांक २३ : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील महान येथे कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गुरांची सुटका करणाऱ्या पोलिसांवर १६ डिसेंबर रोजी हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची न्यायालयाने शनिवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

याप्रकरणी पिंजर पोलिस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत नऊ आरोर्पीना अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

महान येथील २१ मैल परिसरात अमिनाबी मो. सादिक यांच्या घराच्या मागील बाजूस टिनपत्राचे कंपाउंडच्या मोकळ्या जागेत कत्तलीकरिता बांधून ठेवल्याच्या गुरास पोलिस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. या कारणावरू काही लोकांनी पोलिस चौकीत घुसू धिंगाणा घातला व पोलिस कर्मचा- स्वप्निल बडगे यांना चापटा, बुक्क्यांन मारहाण केल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी पोलिस कर्मचारी स्वप्निल बडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरू पिंजर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी मोबीन शे. मुनाफ, मुदस्सीर शे. मोबीन शे. मोहसीन शे. मोबीन, शे. रफिक मजीत, शे. नकीम शे. रफिक, कलीम शे. रफिक, शे. मतीन शे. रफिट मन्नान शे. मजीत, हाजराबी इमरा खान, शहिदाबी शेख रफिक सर्व महान, नजिराखाँ मजीदखाँ रा. कारंज आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपींच्या अटकेसाठी पोलिस प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध सुरू असून, ठाणेदार गंगाधर दराडे तपास करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!