Join WhatsApp group

Ads

महान चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला प्रकरणी अटकेतील,दोन्ही आरोपीची जामिनावर सुटका

By Sarkarmzanews

December 19, 2024 8:51 am

Ads

दिनांक १९ – बर्शिटाकळी : श्याम ठग – तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महान येथील, एकवीस मैल परीसरात कत्तली साठी बांधुन ठेवलेला गोवंश जप्ती कार्यवाही दरम्यान पोलीस कर्मचारी यांच्या सोबत, तेथील नागरीकांनी वाद निर्माण करीत मारहाण केली होती.

त्या प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन आरोपींना जामिन मंजूर..
पिंजर पोलीस स्टेशन कडून प्राप्त माहिती नुसार दि..१६ डिसेंबर२०२४ रोजी सकाळी ११ ते 12 वाजेच्या दरम्यान मिळालेच्या गुप्त माहिती वरून, महान येथील रहीवासी अमिनाबी मो. सादिक यांचे घराचे मागील बाजस असलेले टिन पत्राचे कंपाउंडचे मागे, मोकळ्या जागेत एक पांढऱ्या रंगाचा गोऱ्हा (गोवंश) कत्तलीकरिता बांधून ठेवलेला असताना मिळाला, तो फिर्यादी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला, या कारणामुळे शे.मोबीन शे मुनाफ याने आणलेले लोक व स्त्रिया यांनी पोलीस चौकीत घुसून धिंगाणा व आरडाओरड केला.

त्या वेळी गैर कायद्याच्या मंडळीतील काळा शर्ट घातलेला शे.नकीम शे.रफिक याने फिर्यादी पोलीस कॉन्सटेबल स्वप्निल बडगे यांचा हात पकडून बोलत बोलत चौकीतून बाहेर नेले व फिर्यादीला चापटां बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.फिर्यादीने त्यांच्यावर झालेल्या अचानक हल्ल्यामुळे घाबरून स्वतःची सुटका करण्याचा उद्देशाने पळ काढला असता,आरोपी नामे शे.नकिम शे.रफिक फिर्यादीच्या मागे पळून स्टेट बँक समोर आला.

आरोपीने फिर्यादीस हाताने मारहाण केली, त्यावेळी तेथे उपस्थित असलेले लोकांनी फिर्यादीला वाचविले. त्यानंतर थोड्या वेळाने फिर्यादी पोलीस चौकीत आले असता, मोबीन व त्याचे सह आलेले लोक व स्त्रियांनी पोलीस चौकीतील हेड कॉन्सटेबल भिकासिंग जाधव सुभाष पारधी व फिर्यादी यांच्याशी हुज्जत बाजी करून लोटलाट केली.अशी माहिती ठाणेदार सा.यांना दिली. फिर्यादी बडगे यांच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीसांनी एकून ११ आरोपीवर गुन्हे दाखल केले होते,

त्या मध्ये १) शे.मोबीन शे. मुनाफ,२) मुदस्सीर शे मोबीन ३)शे मोहसीन शे मोबीन ४) शे रफिक शे मजीत ५) शे.नकीम शे. रफिक ६) शे. कलीम शे. रफिक ७) शे मतीन शे रफिक ८) ते मन्नान शे मजीत ९) हाजराबी इमरान खान १०) शहिदाबी शेख रफिक सर्व रा.महान ११) नजिरखा मजीदखा रा.कारंजा या आरोपीवर अप नंबर – 407/2024 कलम 132,121(1), 125 ,189(2), 191(2), 190 भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला,

पुढील तपास सपोनी गंगाधर शेषराव दराडे हे करीत असून या प्रकरणात आरोपी.शे रफिक शे. मजीत व नजिरखा मजीदखा यांना अटक केली होती . काल दि.१७डिसेंबर २०२४ रोजी या दोन आरोपींना बार्शीटाकळी न्यायालयात हजर केले असता वि.न्यायाधीशांनी सदर आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती….

पुन्हा आज दि.१८डिसेंबर २०२४ रोजी महान येथील घटनेतील दोनही आरोपींना, न्यायालयात हजर केले असता, ह्या दोन्ही आरोपींचे वकील ॲड.आशिक अली व ॲड. मोहसिन खान यांनी जोरदार युक्तीवाद केल्यामुळे वि. न्यायाधीश बार्शीटाकळी यांनी,अटकेत असलेल्या दोनही आरोपींना जामीन दिल्याने , त्यांची जामिनावर सुटका झाली. अन्य आरोपी अजूनही फरार असल्याचे समजते.
पुढील तपास पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे हे करत असल्याचे समजते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!