Join WhatsApp group

Ads

अल्पवयीन मुलीवर अपहरण व अत्याचार करणाऱ्यांना माना पोलिसांनी केली अटक

By Sarkarmzanews

December 9, 2024 9:59 am

Ads

प्रेमराज शर्मा : मुर्तीजापुर , ०९ : माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला लग्नाचे आमिष दाखवून नागपूर येथे नेण्यात आले. मुलीचा कुटूबियांनी माना पोलीस स्टेशन मध्ये या बद्दल ४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी या बद्दल तपास सुरु केले नागपूर येथे आरोपी असल्याचे समजले नंतर नागपूर येथून त्या मुलीला पुणे येथे आरोपी घेउन गेल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. तातळीने माना पोलीस यांनी नागपूर वरून पुण्याला धाव घेत इर्शाद शाह नासीर शाहा (२१) नागपूर वरून तर शारिक शाह (२१) या आरोपिला पुण्यातून अटक केली.

सोबत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले तसेच त्या मुलीचे जबाब नोंदविले. लग्नाचा आमिष देऊन त्या मुली वर तीन ते चार वेळा अत्याचार करण्यात आल्याचे मुलीने पोलीसांना जबाब मध्ये नोंदविले.

या प्रकरण मध्ये पोलिसांनी दोन्ही आरोपी वर बीएनएस अंतर्गत १३७(२) ,६४(२),७४ ,७५,७८, ९६ ,३ (५),सहकलम ४,५(एल)६,८,१२,१७, पोक्सो अनुसार गुन्हा दाखल केला असून न्यायाल्याने त्यांना ९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पुढील तपास ठाणेदार सुरज सुरोसे, उपनिरीषक राजेंद्र वानखडे, गणेश महाजन, उमेश हरमकर, आकाश काळे, महिला पोलीस जयश्री मेंढे करीत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!