Join WhatsApp group

Ads

मुर्तीजापुर शहर पोलीसांनी तडीपार गुंडाला केले अटक

By Sarkarmzanews

November 27, 2024 3:27 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २७ नोव्हेंबर २४ – शहरात सनि विजय दूबे वय-२४ गुंड प्रवृत्तीचा एक गुंडाने काही दिवसा अगोदर हैदोस घातला असून त्यावर अनेक गंभिर गुन्हे शहर पोलिस स्टेशन मध्ये दाखल आहे, मागील ८ ऑक्टोबर २४ रोजी मपोअधी कलम ५५/प्र.क्र.८(३)२०२४ कलम अंतर्गत या गुंडाला जिल्हयातून तडीपार करण्यात आले होते.

मात्र पोलीस प्रशासनला आवाहन देत परत शहरात बिन्दास्तपणे हा गुंड वावरत होता. पोलिसांचा सतर्कते मुळे २५ नोव्हेंबर २४ रोजी रात्री ९ वाजता त्याला साबू टायपिंग सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक मुर्तीजापुर येथून मुर्तीजापुर शहर पोलीसांनी त्याचा दुचाकी सह त्याला अटक केली असून अपराध क्र. ४९५/२०२४ कलम १४२ मपोअधी अधिनियम अन्वये कारवाई केली. कारण गुंड प्रवृत्तीचा या इसमा मुळे शहरात जनतेची जीवितहानी व मालमत्ता हानी पोहचवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हि कारवाई मुर्तीजापुर शहर पोलीसांनी करण्याचे समजते.

कारवाई करताना शहर पोलीसचे ठाणेदार अजित जाधव ,पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे , पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल पवन बोडखे उपस्थित होते.

सरकार माझा – लोक हितार्थ अर्पण…..

Related Article

राजकीय आरोप की आर्थिक वाद? मयूर काळे मारहाण प्रकरण चर्चेत

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या बस्तीतील नाला कचऱ्याने तुडुंब; सफाईच्या बिलांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांची तातडीने स्वच्छतेची मागणी!

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!