Join WhatsApp group

Ads

राजेश्वर सेतूच्या नदीपात्रात काटेरी झुडपांमध्ये गांजा; १ किलो ४९४ ग्रॅम साठा जप्त

By Sarkarmzanews

November 11, 2026 11:26 am

Ads

अकोला | प्रतिनिधीअकोल्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार-नार्कोस्ट्राईक’ अंतर्गत जुने शहर पोलिसांनी राजेश्वर सेतू परिसरात कारवाई करत १ किलो ४९४ ग्रॅम गांजा जप्त केला. नदीपात्रातील काटेरी झुडपांमध्ये गांजा बाळगून असलेल्या करण समाधान दामोदर (रा. शांतीनगर, जुने शहर, अकोला) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ९ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. राजेश्वर सेतूच्या बाजूला असलेल्या नदीपात्रातील काटेरी झुडपांमध्ये एका व्यक्तीजवळ गांजा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने पंचांसह घटनास्थळी धाव घेतली. तपासणीदरम्यान करण दामोदर याच्याजवळ १.४९४ किलो गांजा आढळून आला.

या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९६७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. १० नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक निलेश पांडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पितांबर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर दराडे, पोलीस उपनिरीक्षक सुशील कोडापे तसेच पोलीस अंमलदार शेख असलम, श्रीकांत पवार, सागर शिरसाट, आशिष नांदोकार व संतोष लोकपुरे यांच्या पथकाने केली.

राजेश्वर सेतू परिसरातील नदीपात्र आणि काटेरी झुडपांमध्ये गांजा आढळणे ही केवळ एका व्यक्तीविरोधातील कारवाई म्हणून पाहून चालणार नाही.

अमली पदार्थांचा साठा त्या ठिकाणी कसा पोहोचला, तो कोणाकडून आणला गेला आणि त्याचा पुढील पुरवठा कुठे होणार होता, हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत.१ किलो ४९४ ग्रॅम गांजा जप्त झाल्यानंतर आता पोलिसांसमोर केवळ आरोपीची चौकशी नव्हे, तर या साठ्यामागील संभाव्य पुरवठादार, संपर्क आणि वितरणाच्या मार्गाचा शोध घेण्याचे आव्हान आहे.

कारवाईत गांजा जप्त झाला, आरोपी पोलीस कोठडीत गेला; पण या साठ्याचा मूळ स्रोत शोधून संपूर्ण साखळी उघडकीस येते का, याकडे आता लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!