Join WhatsApp group

Ads

पिंजरमध्ये कथित जुगाराचा बाजार; तक्रारीनंतरही कारवाईचा पत्ता नाही!

By Sarkarmzanews

October 21, 2026 3:17 pm

Ads

पिंजर : पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असल्याचा आरोप असलेल्या कथित अवैध जुगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी मूर्तिजापूर शहरातील नगरसेवक तसवर खान यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, मूर्तिजापूर यांना जनहितार्थ स्मरणपत्र दिले आहे.यापूर्वी याच विषयावर लेखी तक्रार करण्यात आली होती.

मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्मरणपत्रातून करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रार आणि स्मरणपत्रानंतरही कारवाई शून्य, तर कथित जुगार अड्डे मात्र सुरूच असल्याचा दावा करण्यात आला आहे.दुष्काळाच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत असताना अवैध जुगारामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक व कुटुंबांवर आर्थिक परिणाम होत असल्याचे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.

स्मरणपत्रात पोलिस प्रशासनाशी कथित आर्थिक व्यवहार तसेच राजकीय संबंधांचा प्रभाव असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

त्यामुळे पोलिस प्रशासनाने तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे अपेक्षित आहे.कथित जुगार अड्डे तातडीने बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक तसवर खान यांनी केली आहे.

कारवाई न झाल्यास जनआंदोलन आणि आमरण उपोषणाचा इशाराही स्मरणपत्रातून देण्यात आला आहे.

सरकार माझा न्यूजचा सवाल : तक्रार आणि स्मरणपत्रानंतरही जर कथित जुगार अड्डे सुरू असल्याचा आरोप होत असेल, तर पोलिस प्रशासनाने याची प्रत्यक्ष तपासणी करून कारवाई झाली की नाही, हे स्पष्ट करणे गरजेचे आहे.

Related Article

राजकीय आरोप की आर्थिक वाद? मयूर काळे मारहाण प्रकरण चर्चेत

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या बस्तीतील नाला कचऱ्याने तुडुंब; सफाईच्या बिलांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांची तातडीने स्वच्छतेची मागणी!

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!