Join WhatsApp group

Ads

--

शिवणी विमानतळासमोरील अर्धवट उड्डाणपुला विरोधात नागरिकांचा इशारा; ३० जुलैला रास्ता रोको आंदोलन

By Sarkar Maza

July 14, 2026 9:12 am

Ads

नियमबाह्य मंजुरी, कोट्यवधींचा निधी वाया, रस्त्यावर उडणाऱ्या फ्लायॲशमुळे अपघात व आरोग्याचा धोका; दोषींवर कारवाईची मागणी

अकोला | प्रतिनिधी

अकोला शहरातील शिवणी विमानतळासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (NH-06) वरील अर्धवट उड्डाणपुलाच्या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभाग, प्रकल्प संचालक तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन उड्डाणपुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे किंवा ते हटवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शिवणी विमानतळासमोरील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले; मात्र ते अर्धवट अवस्थेतच बंद पडले.

विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांची माहिती असतानाही संबंधित विभागाने प्रकल्पास मंजुरी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नंतर परवानगी नाकारल्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी वाया गेल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच झालेल्या खर्चाची वसुली त्यांच्याकडून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अर्धवट कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लायॲश (राख) पसरलेली असून ती वाहनांच्या वाऱ्यामुळे हवेत उडते. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि इतर वाहनचालकांच्या डोळ्यांत राख जाऊन अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या धुळीमुळे श्वसनाच्या आजारांचा धोका वाढत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

निवेदनात या परिसरात यापूर्वी माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष स्व. तुकारामजी बिडकर यांचा भीषण अपघात होऊन मृत्यू झाल्याचाही उल्लेख करण्यात आला असून, या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे अर्धवट उड्डाणपुलाचे काम पूर्ण करणे किंवा हटविणे, रस्त्यावरील फ्लायॲश तात्काळ साफ करणे, बॅरिकेडिंग, सूचना फलक, नियमित पाणी मारणे, तसेच काम बंद का करण्यात आले याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या मागण्यांची दखल न घेतल्यास ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १२ वाजता शिवणी विमानतळासमोर तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

Related Article

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूरात पोलिसांचा शस्त्र सराव

शिवणी विमानतळासमोरील अर्धवट उड्डाणपुला विरोधात नागरिकांचा इशारा; ३० जुलैला रास्ता रोको आंदोलन

बोगस बियाणे, खत कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा; आमदार हरिष पिंपळे आक्रमक नियम धाब्यावर ठेवणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी;

मुर्तिजापूरात बंदी असलेली स्वीट सुपारी खुलेआम विक्रीला?; लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासन कारवाई करणार का?

विधानसभेत घुमला शेतकऱ्यांचा आवाज; हरिष पिंपळे यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद

पक्षांतराच्या अफवा निराधार; विकासकामांसाठीच आमदारांची भेट – वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचे स्पष्टीकरण

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!