Join WhatsApp group

Ads

-

वास्तुशांतीच्या जेवणात धक्का लागला अन् फायटरने डोक्यावर वार!

By Sarkarmzanews

November 24, 2026 7:14 pm

Ads

मुर्तिजापूर : मित्राच्या घरी आयोजित वास्तुशांतीच्या कार्यक्रमात जेवण वाढत असताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला शिवीगाळ करीत चापट मारली आणि जवळील फायटरने डोक्यावर वार करून जखमी केल्याची घटना मुर्तिजापूर शहरातील राणा लेआउट परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील बाळू शेलोकार (वय २३, रा. गोयंका नगर, मुर्तिजापूर) हा २३ नोव्हेंबर रोजी मित्राच्या घरी आयोजित वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला गेला होता. सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान जेवण वाढले जात असताना त्याचा धक्का साहील अविनाश अबुंलकर (वय अंदाजे २२, रा. डाबकी रोड, अकोला) याला लागला. यावरून साहीलने निखीलला शिवीगाळ केली.

निखीलने शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता आरोपीने त्याला चापट मारली आणि जवळ असलेल्या फायटरने डोक्यावर वार करून जखमी केले.या प्रकरणी निखील शेलोकार यांच्या तक्रारीवरून मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. ७५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम मडावी करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही मसपोउपनि उज्ज्वला भाले यांनी केली.

NEWS PHOTO – AI GENRATED

Related Article

१० महिन्यांच्या चिमुकलीचा अवघ्या काही तासांत मृत्यू; अवघाते बाल रुग्णालयात खळबळ!

पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने अघोरी पूजा; अकोल्यातील तरुणाचा नरबळी दिल्याचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप!

खामगावच्या रुग्णाला चक्क मुदत संपलेली सलाईन चढवल्याचा आरोप; अकोला जीएमसीतील औषध वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

आजारी महिलेच्या हॉस्पिटलमध्येच हप्त्याच्या वसुलीसाठी मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांचा तगादा; शेतकरी संघटनेचा संताप!

अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई शहानुरमध्ये गांजाची १२ झाडे जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

समाजात काम करणारा नेता बनविण्यात पत्रकारांचे मौलिक योगदान! – शिक्षक आमदार अॕड.किरणराव सरनाईक

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!