Join WhatsApp group

Ads

-

समाजात काम करणारा नेता बनविण्यात पत्रकारांचे मौलिक योगदान! – शिक्षक आमदार अॕड.किरणराव सरनाईक

By Sarkarmzanews

November 17, 2026 10:57 am

Ads

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६३ व्या पत्रकार विचारमंथन मेळाव्यात शिक्षकांसह सर्वा़साठीच कटीबध्दतेची सरनाईकांची ग्वाही**

३१ शिक्षकांचा सन्मान,रंगकर्मी रमेश थोरात यांना “लोक स्वातंत्र्य कला रत्न जीवन गौरव” यांना राज्यस्तरीय पुरस्कार,आय वितरण कार्ड वितरण,संभाजीनगरचे प्रवीण बुरूडे व बुलढाणाचे सचिन ठाकरे यांना जिल्हाध्यक्ष,प्रेमराज शर्मा यांना मुर्तिजापूर तालूका अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्रे.

अकोला-पत्रकार हे राष्ट्राचे चौथे सशक्त आधारस्तंभ हे लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणारे पहारेकरी असून समाजात चांगलं काम करणाऱ्या नेता बनविण्यासाठी ते आपल्या समर्थ लेखणीचे मौलिक योगदान देत असतात.चुकला त्याला पदावरून खाली उतरविण्याचेही काम सुध्दा पत्रकार करू शकतात.

अशा पत्रकारांच्या साक्षीने माझ्या सत्कारासह ३१ शिक्षकांचा सन्मान लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने घडवून आणला. विजयानंतर पत्रकार महासंघाने घडवून आणलेला हा माझा प्रथम सत्कार आहे.शिस्तबध्द आणि पारदर्शकपणे राज्यात आणि इतरत्र काम करणारी ही संघटना गौरवास पात्र आहे.असे प्रतिपादन अमरावती शिक्षक मतदार संघात उच्चांकाचे विजयी झालेले विधान परिषद सदस्य ,शिक्षक आमदार अॕड.किरणराव सरनाईक यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भावनिक सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शहिद जवान,दिवंगत पत्रकार,शेतकरी,महिला व ईतर विविध बळींना अभि.पत्रकार विनायक पांडे यांच्या शंखनादासोबत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा ६३ वा पत्रकार विचारमंथन मेळावा,सन्मान,मार्गदर्शन आणि आय कार्ड व नियुक्तीपत्र वितरण समारंभ नुकताच संपन्नझाला.स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी, पथनाट्यकार इंजि.रमेश थोरात तर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद माजी आमदार,शिवसेना उपनेते गोपिकिशन बाजोरिया,प्रा.डॉ.प्रकाश बोरकर,वाशिम चे समाजसेवी गिरधारीलाल सारडा, तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, डॉ.आर. बी.हेडा,शिवसेना विदर्भ प्रवक्ता प्रा.प्रकाश डवले,कादंबरीकार व लोकस्वातंत्र्य पदाधिकारी पुष्पराज गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंग ज्येष्ठ रंगकर्मी रमेश थोरात यांना “लोकस्वातंत्र्य कला रत्न जीवन गौरव” या राज्यस्तरीय पुरस्कारादाखल सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल बुके देऊन व ईतर अतिथींना सुध्दा सन्मानित करण्यात आले.

अभि.पत्रकार विनायक पांडे यांची शासनाकडून कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरला प्रवीण बुरूडे तर बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदावर दुरदर्शन, आकाशवाणीच्या सचिन ठाकरे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.त्यांना व सभासदांना अतिथींच्या हस्ते आय कार्ड वितरीत करण्यात आली.

उपस्थित ३१ शिक्षकांचे सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले.वेतन नसलेल्या शिक्षकांना टप्प्या टप्प्याने पूर्णवेतनामध्ये आणले असून,सोबतच पत्रकार आणि समाजाचेही प्रश्न‌ सोडविण्यासाठी आपण कटीबध्द राहू अशी ग्वाही देऊन वाचन संस्कृती वाढण्याची अपेक्षा आमदार सरनाईक यांनी पुढे बोलतांना व्यक्त केली..गोपीकिशन बाजोरिया,डॉ.रमेश थोरात व अतिथींनी सुध्दा लोकस्वातंत्र्यच्या यशाचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी पत्रकारांचे प्रश्न, जाहिरात,कल्याण योजना आणि बस प्रवास सवलतीच्या प्रश्नांसह सुरू असलेल्या पत्रकार आणि समाज कल्याणाच्या उपक्रमांची माहिती दिली.

पुष्पराज गावंडे यांनी सुध्दा संघटने बद्दल माहिती दिली.यावेळीलोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेंद्र देशमुख,प्रा.राजाभाऊ देशमुख,अंबादास तल्हार, डॉ. शंकरराव सांगळे,यांची प्रमुख उपस्थिती होती.,प्रा.विजयराव काटे, के‌.व्ही. देशमुख,संतोष धरमकार, यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला प्रा‌.मोहन काळे,प्रा.डॉ.निशाली पंचगाम,प्रा.डॉ.किरण वाघमारे ,प्रा.डॉ.दीपाली सोसे,प्रा.डॉ.जयश्री देशमुख,प्रा.डॉ.अशोक शिरसाट,प्रा.डॉ.बाळकृष्ण खंडारे, डॉ.मनोहर घुगे, डॉ.गौरव देशमुख,ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम,मनोहर मोहोड,श्रीकृष्ण माळी,दिलीप नवले,आशिष वानखेडे पाटील,नवनिर्वाचित बुलढाणा जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे,सुरेश तिडके,अभि.विनायक पांडे,प्रा.महादेव लूले,कैलास टकोरे,कृष्णा देशमुख,नागोराव मोहोड,नारायणराव अंधारे,प्रेमराज शर्मा,चांद रिजवी,भानुदास कराळे,वसंतराव देशमुख,विजयराव बाहकर,देवीदास घोरळ,सुवर्णसिंग खटोड,रमेश समुद्रे, नितीन लोडम,सुनिल दोड, दिपक शिरसाट,अमित इंगळे,अजय वानखडे,नरेंद्र डंबाळे,आतिश सोसे,अनिल केळकर, डॉ.के.बी.देशमुख,नंदशाम कुकडकर,दिपकराव बिरकड,अरविंद गिऱ्हे,शिवराजे जामोदे,बुढन गाडेकर,फुलचंद वानखडे,एजाज अहमद,खान नितीन गवई,सौ.कल्पना काटे,सौ.मंजुषा माळी,सौ.सुनिता गिऱ्हे,सौ.सुजाता खंडारे,सौ.ममता पटोले,कविता काटकर,अमर तळोकार,सुभाषराव घुगे, जे.टी. वाकोडे, पंकज राठी,अमोल जामनेर,देवानंद ढोरे,सोनु भाऊ देशमुख,रामभाऊ वानखडे,शुभांगी केळकर,पवन निखाडे,विधी वानखडे,समिक्षा वानखडे,,प्राची खेळकर, व अनेक पत्रकार,शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचलन प्रा.देवबाबू लूले तर आभारप्रदर्शन राजेंद्रबाप्पू देशमुख यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Article

समाजात काम करणारा नेता बनविण्यात पत्रकारांचे मौलिक योगदान! – शिक्षक आमदार अॕड.किरणराव सरनाईक

पेट्रोल-डिझेलमधील कथित भेसळीविरोधात अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस!बार्शीटाकळी व पातूरमधील अवैध विक्रीचे गंभीर आरोप; जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न

अकोला बसस्थानकात ‘नो पार्किंग’चा फज्जा!पोलीस चौकी समोरच पोलिसांची वाहने?

नंबर एक, गाड्या दोन! मंगेशने नेमकी काय भानगड केली ?

हिरपूर रोडवरील उड्डाणपुलाजवळ पोलिसांचा गांजा तस्करीवर प्रहार!ऑटोमधून दोन किलो गांजा जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सरकार माझा न्यूजची विशेष नजर : फटाक्यांचा शिल्लक साठा कुठे? प्रशासनाचे लक्ष आहे का?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!