Join WhatsApp group

Ads

एक तडीपार तर एकावर एमपीडी – अकोला पोलीसांची कारवाई

By Sarkarmzanews

June 3, 2025 12:09 pm

Ads

दिनांक : ०३ जून २५ : अकोला शहरातील झिराबावडी, खदान, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड समिरोद्दीन नाजिमोद्दीन, वय २२ वर्ष, याचे वर यापुर्वी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहोचवणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे, शांतताभंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धाकदपटशा करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड समिरोद्दीन नाजिमोद्दीन, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, श्री. अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबीची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि.०२/०६/२०२५ रोजी पारीत केला.

मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून समिरोद्दीन नाजिमोद्दीन जगाचा तात्काळ शोथ घेवुन त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक ०२/०६/२०२५ रोजी जिल्हा कारागृहे।त स्थानबध्द केले.

तसेच मलकापुर जिल्हा अकोला येथील रहिवासी मितेश अमर गिरी वय २३ वर्ष यास मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब, अकोला यांचे आदेश के फौजदारी प्रकरण कं / ९७/२०२४ कलम ५६ (अ) (ब) मु.पो.का प्रमाणे तो सतत गुन्हे करीत असल्याने त्यास ०६ महिण्याकरीता तडीपार करण्यात आल्याने त्याचा शोध घेवुन तो मिळुन आल्याने त्याला तडीपार आदेश तामील करून त्यास अकोला उपविभागातुन (तालुका अकोला) व तालुका बाळापुर येथुन ०६ महिण्याकरीता तडीपार करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पूर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, श्री. अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि, माजीद पठाण, पोहेकॉ. ज्ञानेश्वर सैरिसे, पोकॉ. उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच पोलीस स्टेशन खदान येथील पोनि, मनोज केदारे, पोलीस अंमलदार नितीन मगर, निलेश खंडारे, अमित दुबे, संजय वानखडे, दिनकर धुरंदर, रोहीत पवार, आकाश राठोड, यांनी परिश्रम घेतले.

अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे पोलीस स्टेशन खदान जि. अकोला हद्दीत गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तसेच आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे “असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक अर्पित चांडक यांनी दिला.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!