Join WhatsApp group

Ads

दिव्यांग विशाल चे रवी राठी यांनी स्वीकारले पालकत्तव – वात्सल्यधाम वृद्धाश्रम सामान्य नागरिकांच्या सेवेत सुरू

By Sarkarmzanews

January 10, 2025 7:23 pm

Ads

मुर्तीजापुर – दिनांक १० – गेल्या अनेक वर्षांपासून बेघर बे सहारा असलेला विशाल चव्हाण हा बार्शीटाकळी येथील घरकुल विभागात राहत आहे याचे आई-वडिलांचे छत्र हरवले आहे नातेवाईकांकडे काही दिवस काढून हा आतापर्यंत त्यांनी आपले जीवन जगवले मात्र परिस्थिती ही त्याला जगू देत नव्हती त्याच बरोबर नातेवाईक सुद्धा किती दिवस याचा सांभाळा करतील अशातच विशाल हा हतबल झाला होता.

त्याला फिट येण्याची सुरुवात झाली होती, त्यामध्ये तो एका हाताने दिव्यांग, तो विवंचनेत होता अशातच सामाजिक कार्यकर्ता विशाल टोम्पे रा.कोळसरा यांनी समाजसेवक रवी राठी यांच्या वात्सल्यधाम वृद्धाश्रमाची माहिती त्यांना होती त्यांनी समाजसेवक रवी राठी यांना संपर्क साधत विशाल चव्हाण ला तेथे पाठवण्याचा निश्चय केला विशाल टोम्पे आणि त्यांची बहीण या दोघांनी विशाल चव्हाण याला मुर्तीजापुर तालुक्यातील दाळंबी येथील वात्सल्य धाम या आश्रमात त्यांना घेऊन आले.

येथे समाजसेवक रवी राठी यांनी त्यांची पूर्ण जबाबदारी स्वीकारत त्यांना आपल्या आश्रमामध्ये आश्रय दिला आता विशाल ची संपूर्ण जबाबदारी ही समाजसेवक रवी राठी करत आहे समाजाला आदर्श निर्माण व्हावा अशा हेतूच हे वात्सल्यधाम आश्रम आता बेघर बे सहारा वृद्धांच्या सेवेत सुरू झाला आहे.

या आश्रमात महिलांना पुरुषांना राहण्याची वेगळी व्यवस्था त्याचबरोबर त्यांचे आरोग्य ,जेवणाची व्यवस्था त्याचबरोबर मनोरंजनाची व्यवस्था सुद्धा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे ही सर्व सोयीसुविधा निशुल्क असून याची सर्व जबाबदारी हे समाजसेवक रवी राठी हे करत आहे त्यामुळे समाजासमोर रवी राठी यांनी आदर्श निर्माण केला आहे फुलांच्या पुष्प वर्षावाने दिव्यांग विशाल चे स्वागत स्वर्गीय रमेशचंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वात्सल्यधाम वृद्धाश्रमाचे संचालक रवी राठी, मनीष राठी, गजानन दाहाळे, योगेश विजयकर, ऋषिकेश पवार, निरंजन सोळंके, सौरभ सरकटे, यांनी यावेळी स्वागत करत विशाल ला शुभेच्छा दिल्या.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!