Join WhatsApp group

Ads

मुर्तीजापुर नगरपरिषद हद्दीत छत्री तलावात अवैद्य उत्खनन शासनाला लाखो रुपयांचा चुना….! ‌

By Sarkarmzanews

December 5, 2024 8:17 am

Ads

संतोष माने : दिनांक ५:मुर्तीजापुर:नगरपरिषद हद्दीत छत्रीतलावाच्या सौंदर्यकरणाच्या नावावर लाखो रुपयांचा निधी उपलब्ध असून काम जोमाने सुरू आहे.

पण एका ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराला त्यातील मुरूम हा रोडवर टाकण्यासाठी विक्री केल्याची धक्कादायक बाब दिनांक २ डिसेंबरच्या रात्री स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही बाब लक्षात आली.

तेथील अवैध्य उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला रात्री 9 वाजता दिल्यानंतर महसूल अधिकारी पोहचले रात्री 12:30 वाजता या कालखंडात 2 पोकलेन, जेसीबी व 6 टिप्पर याच्या माध्यमातून अंदाजे 2000 ब्रास चे अवैद्य उत्खनन करून देवरन रस्त्यावर अंदाजे एक किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावर या तलावातील मुरूम टाकण्यात आला.

त्या मुरुमाची शासकीय किंमत लाखो रुपयांची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्याची खमंग चर्चा जनसामान्या नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसत आहे. शासकीय नियमाप्रमाणे रात्रीचे उत्खनन करता येत नाही.

पण हे उत्खनन कोणाच्या आदेशाने सुरू असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. या ठेकेदारावर कोणत्या गॉडफादरचा त्याच्या डोक्यावर हात आहे. पण या ठिकाणी वेगळाच घडत असल्याचं दिसून आलं. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार थांबवण्यात आला.

महसूल विभागाचे मंडळ अधिकारी राजू जाधव व तलाठी राजेंद्र पुरी हे घटनास्थळी पोचले प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंडळ अधिकारी यांना महसूल प्रशासन कारवाईसाठी कमकुवत पडत असल्याचे प्रश्न विचारले तर मंडल अधिकारी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही.

उपस्थित नागरिकांना त्यांनी सांगितले सकाळी दहा वाजेपर्यंत कारवाई करणार असल्याचे सांगितले. महसूल विभाग या अवैद्य खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करतात. त्या ठेकेदाराच्या टिप्पर व पोकलेन ह्या सुद्धा अजून पर्यंत जप्त करण्यात आल्या नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांनी सदर प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी दिनांक 3 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार रवींद्र राऊत, अकोला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. सदर निवेदन मोहम्मद रफी शिरा उद्दीन, फिरोज खान अजमत खान यांनी निवेदन सादर केले.

Related Article

“पोटदुखीने रुग्णालयात गेली अन् धक्कादायक सत्य समोर; १८ वर्षीय तरुणी गर्भवती, दहावीतील मुलाविरोधात गुन्हा”

पिंजरमध्ये कथित जुगाराचा बाजार; तक्रारीनंतरही कारवाईचा पत्ता नाही!

राजकीय आरोप की आर्थिक वाद? मयूर काळे मारहाण प्रकरण चर्चेत

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या बस्तीतील नाला कचऱ्याने तुडुंब; सफाईच्या बिलांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांची तातडीने स्वच्छतेची मागणी!

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!