Join Whatsapp

अकोला शहराने गमावला हिंदू नेता

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क : अकोला दिनांक ०१: विदर्भाची शान, अ. भा. हिंदुसेना प्रमुख आणि हिंदू ज्ञानपीठचे संस्थापक धर्मवीर श्री चंद्रशेखर गाडगीळ यांचे आज, १ डिसेंबर रोजी पहाटे दुःखद निधन झाले.

त्यांचा जीवनप्रवास हे एक प्रेरणास्थान होते. हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी आणि देशाच्या अखंडतेसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अ. भा. हिंदुसेनेने समाजातील विविध अडचणींवर मात केली आणि अनेक महत्त्वाचे कार्य केले. गाडगीळ यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांचा आदर्श नेहमीच प्रेरणादायक राहील.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!