Join WhatsApp group

Ads

नंबर एक, गाड्या दोन! मंगेशने नेमकी काय भानगड केली ?

By Sarkarmzanews

November 14, 2026 6:20 pm

Ads

अकोला : अकोला शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेताना एकाच नोंदणी क्रमांकाच्या दोन मोटारसायकली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने चोरीची मोटारसायकल हस्तगत करून एका संशयिताला ताब्यात घेतले असून, मूर्तिजापूर येथे आढळलेली त्याच क्रमांकाची दुसरी मोटारसायकलही ताब्यात घेतली आहे.

१३ नोव्हेंबर रोजी संजय ठोंबरे यांची स्प्लेंडर मोटारसायकल (MH 30 Z 3492) पोस्ट ऑफिस परिसरातून चोरीस गेली होती. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने अशोक वाटिका चौकातून मंगेश कसनदास राठोड (२७, रा. जनुना, ता. बार्शीटाकळी) याला ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, याच क्रमांकाची दुसरी मोटारसायकल मूर्तिजापूर येथे आढळल्याने तीही पोलिसांनी ताब्यात घेतली. एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी आढळल्याने दुसऱ्या वाहनाच्या कागदपत्रांची व नोंदणीची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व प्रभारी अपर पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!