Join WhatsApp group

Ads

‘हर घर तिरंगा’ अभियानात मूर्तिजापूर तालुक्याचा राज्यात आदर्श निर्माण करूया : आमदार हरीश पिंपळे

By Sarkar Maza

August 7, 2026 2:51 pm

Ads

मूर्तिजापूर, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला यंदाही मूर्तिजापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा आणि तालुक्याचा राज्यात आदर्श निर्माण व्हावा, या उद्देशाने आमदार हरीश पिंपळे यांनी प्रशासन व नागरिकांना आवाहन केले आहे.९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे.

प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि शहरातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज सन्मानाने फडकावा, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले की, तिरंगा हा देशाच्या एकात्मतेचे, स्वाभिमानाचे आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवावा. विशेषतः युवक, महिला, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन देशभक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा.

या अभियानात मूर्तिजापूर तालुका राज्यात अग्रस्थानी राहावा, यासाठी ग्रामपंचायती, नगर परिषद, शाळा-महाविद्यालये, विविध शासकीय विभाग आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक नागरिकापर्यंत तिरंगा सहज उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक नियोजन करण्याबरोबरच व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात यावी, असेही त्यांनी सुचविले.

यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “आपला राष्ट्रध्वज हा आपल्या देशाच्या गौरवाचे प्रतीक आहे. प्रत्येक कुटुंबाने राष्ट्रभक्तीची भावना जोपासत आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करून मूर्तिजापूर तालुक्याचा राज्यात वेगळा आदर्श निर्माण करावा.

“स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही देशभरात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!